शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

गुप्तधन शोधणारी टोळी सक्रीय; पाच जणांना अटक

By admin | Updated: October 30, 2014 22:55 IST

गुप्तधनाच्या मागे लागून अनेक लोक आपले सर्वस्व हरपून बसतात़ हा प्रकार विदर्भात मोठ्या प्रमाणात घडत असल्याचे ऐकीवात आहे़ बुधवारी (दि़२९) शहर पोलिसांच्या मार्शल कमांडो पथकाने केलेल्या

तीन कासवांसह वाहने जप्त : आरोपी वनविभागाच्या स्वाधीनवर्धा : गुप्तधनाच्या मागे लागून अनेक लोक आपले सर्वस्व हरपून बसतात़ हा प्रकार विदर्भात मोठ्या प्रमाणात घडत असल्याचे ऐकीवात आहे़ बुधवारी (दि़२९) शहर पोलिसांच्या मार्शल कमांडो पथकाने केलेल्या कारवाईत हे उघड झाले आहे़ बुधवारी पोलिसांनी गुप्तधन शोधणाऱ्या टोळीतील पाच जणांना तीन कासवांसह ताब्यात घेतले़ सदर प्रकरण वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आले़ गुप्तधन शोधणारी टोळी विदर्भात तसेच महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर सक्रीय आहे़ या टोळीमार्फत विविध प्रकाराने गुप्त धन शोधून दिले जात असल्याचे दावे केले जातात़ यामुळे अनेक नागरिक त्यांच्या जाळ्यात अडकतात़ या टोळीद्वारे कजली करणे, पायाळू माणसामार्फत शोध घेणे, बळी देणे, पांढरे घुबड वा २०-२१ नखे असलेल्या कासवांच्या माध्यमातून गुप्तधन शोधून दिले जात असल्याचा दावा केला जातो़ यासाठी सदर टोळीतील इसम पांढरे घुबड, कासव, पायाळू व्यक्तीही सोबत बाळगत असल्याचे अनेकदा आढळून आले आहे़ अशाच एका टोळीला बुधवारी वर्धा पोलिसांच्या मार्शल कमांडो पथकाने ताब्यात घेतले़ ही कारवाई शहरातील धुनिवाले मठ चौक परिसरात दुपारी ४़३० वाजताच्या सुमारास करण्यात आली़ धुनीवाले चौकात दोघे संशयित पिशवी घेऊन वावरत असल्याचे दिसून आले़ दरम्यान, एम.एच. ३१ सी़एम़ १८४ क्रमांकाच्या कॉलीस या वाहनात काही जण आले; पण पोलिसांना पाहताच ते घाबरले व त्यांनी पळ काढला. पोलिसांनी त्यांचा माग घेत त्यांना ताब्यात घेतले़ यात शंकर सावरकर रा. खापरी, उमेश बुराडे रा. खापरी, किसना बाळपांडे रा. कोंढाळी, सचिन सोनटक्के व गजानन साटोणे दोन्ही रा. काटोल या पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन जिवंत कासव, एक दुचाकी, एक चार चाकी वाहन आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ या प्रकरणी पाचही आरोपींवर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही कारवाई मार्शल कमांडो पथकातील विकास राठोड, दिनेश चव्हाण व सहकाऱ्यांनी केली़ यानंतर पोलिसांनी सदर प्रकरण पूढील चौकशी व कारवाईसाठी वन विभागाकडे वर्ग केले आहे़ या टोळीकडून मोठे रहस्य उलगडले जाण्याची शक्यता वनविभागाने व्यक्त केली आहे़ कासव हा प्राणी वन्यजीव संरक्षण कायद्यात शेड्यूल एकमध्ये समावेशित आहे़ यामुळे कासव बाळगणे, शिकार करणे वा व्यापार करणे गुन्हा आहे़ या प्रकरणात सात वर्षे सश्रम कारावास आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते, असेही वनविभागाद्वारे सांगण्यात आले आहे़(कार्यालय प्रतिनिधी)