शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

२५ फेऱ्यांमध्ये होणार मतमोजणी

By admin | Updated: October 18, 2014 01:46 IST

विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीला रविवारी सकाळी ८ वाजतापासून प्रारंभ होणार आहे.

वर्धा : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीला रविवारी सकाळी ८ वाजतापासून प्रारंभ होणार आहे. वर्धा व देवळी विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी वर्धेतील भारतीय खाद्य निगम (एफसीआय) गोदाम क्रमांक २१ मध्ये सकाळी ८ वाजतापासून होईल. मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. तसेच या परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.देवळी विधानसभा मतदारसंघात १४ टेबलवर मतमोजणी होणार असून, संपूर्ण मतमोजणी २४ फेऱ्यामध्ये होईल. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर तीन कर्मचारी राहणार आहेत. प्रारंभी पोस्टल बॅलेटची मोजणी होईल. त्यानंतर ईव्हीएम मशीनवरील मतमोजणीला प्रारंभ होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शिरीष पांडे यांनी दिली.वर्धा विधानसभा मतदार संघातील मतमोजणी एफसीआय गोदामातच होत असून मतमोजणीसाठी १४ टेबल राहणार आहेत. २५ फेऱ्यांमध्ये मतमोजणी करण्यात येणार असून, मतमोजणीचे निकाल तीन ते चार वाजेपर्यंत लागतील अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली.हिंगणघाट विधानसभा निवडणूक मतमोजणी नवीन तहसील कार्यालयाच्या इमारतीत होत असून १४ टेबलवर २४ फेऱ्यांमध्ये मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे. उमेदवार तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या वाहनांसाठी गोकुलधाम येथे वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी घनश्याम भुगावकर यांनी दिली.आर्वी येथील मतमोजणी गांधी विद्यालय येथे होत असून १४ टेबलवर २६ फेऱ्यामध्ये मतमोजणीची प्रक्रिया पुर्ण होईल. परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशेष पासेस देण्यात आल्या आहेत. याच परिसरात माध्यमी प्रतिनिधीसाठीही व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विलास ठाकरे यांनी दिली. तयारीची पाहणी जिल्हाधिकारी सोना व निवडणूक अधिकाऱ्यांच्यावतीने करण्यात आली.(प्रतिनिधी)