शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

कापूस बाजारात येताच क्विंटलमागे ६०० रुपयांची घट

By admin | Updated: October 30, 2016 00:59 IST

मराठवाड्यात एक महिन्यापूर्वी खासगी व्यापाऱ्यांनी ५ हजार ५०० रुपये प्रती क्विंटल भावाने कापूस खरेदीचा मुर्हूत केला.

व्यापाऱ्यांचा प्रताप : शेतकऱ्यांची होतेय मुस्कटदाबीफणिंद्र रघाटाटे  रोहणामराठवाड्यात एक महिन्यापूर्वी खासगी व्यापाऱ्यांनी ५ हजार ५०० रुपये प्रती क्विंटल भावाने कापूस खरेदीचा मुर्हूत केला. हा भाव कायम राहील, असा अंदाजही व्यापाऱ्यांनी व्यक्त केला; पण विदर्भातील शेतकऱ्यांचा कापूस निघून तो खासगी व्यापाऱ्याकडे विक्रीसाठी येताच त्यात ६०० रुपयांची घट करण्यात आली. ४९०० रुपयांप्रमाणे कापूस खरेदी सुरू केली आहे. याउपर आम्ही शासनाच्या हमीभावापेक्षा अधिकच देत आहे, अशी मल्लीनाथी करायला व्यापारी विसरले नाहीत.मराठवाड्यात अल्प प्रमाणात कापूस पिकत असला तरी विदर्भाच्या तुलनेत तेथे कापूस आधीच निघतो. परिणामी, मराठवाड्यात कापसाची खरेदी आधी सुरू होते. एक महिन्यापूर्वी मराठवाड्यात खासगी व्यापाऱ्यांनी ५ हजार ५०० रुपये प्रती क्विंटल भावाने कापूस खरेदी केली. त्यावेळी कापसाचा घटता पेरा व उत्पादनातील घटीमुळे हे भाव हंगामाच्या शेवटपर्यंत कायम राहतील, असा अंदाज शासकीय तज्ज्ञ व व्यापाऱ्यांनी व्यक्त केला होता; पण प्रत्यक्षात आता विदर्भातील शेतकऱ्यांचा कापूस बाजारात येऊ लागला आहे. शासन हमीभावाने १५ नोव्हेंबरनंतर कापूस खरेदी करणार असल्याने शेतकऱ्यांसाठी शासकीय खरेदी कुचकामी ठरणार आहे. सोयाबीनच्या उत्पादनात झालेला खर्चही भरून न निघालेल्या शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करण्यासाठी नुकताच वेचून आणलेला कापूस विकण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. वर्धा, वायगाव व सेलू येथे खासगी व्यापाऱ्यांनी कापूस खरेदी सुरू केली. पहिल्या दिवशी ५ हजार १५१ रुपये भावाने कापूस घेण्यात आला; पण दोन दिवसांत भाव ४ हजार ९०० पर्यंत खाली आणले. किमान काही दिवस तरी मराठवाड्यातील कापूस खरेदीचा भाव विदर्भातील शेतकऱ्यांना मिळेल, ही अपेक्षा मृगजळ ठरली. भाव एवढे कमी का, असे कापूस उत्पादकांनी विचारताच व्यापारी, अहो आम्ही शासनापेक्षा आठाणे अधिकच देत आहे, यात समाधान माना, अशी मल्लीनाथी करतात. यंदा कापसाचा पेरा कमी व लाल्याच्या प्रभावाने उत्पादनात मोठी घट येणार, हे सूर्य प्रकाशाइतके सत्य आहे. आज व्यापारी ज्या कापसाला पाच हजारही भाव द्यायला तयार नाही, त्याच कापसावर व्यापारी प्रक्रिया करवून सरकी व रूईगाठी विकल्यावर त्यांना खर्च वजा सहा हजारांपेक्षा जास्त भाव मिळणार, हे देखील निश्चितच खोटे नाही. म्हणजे उत्पादक उपाशी अन खरेदीदार तुपाशी, हे वास्तव यंदाही प्रत्ययास येणार असल्याचेच दिसते.