शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
5
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
6
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
7
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
8
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
9
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
10
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
11
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
12
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
13
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
14
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
15
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
16
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
17
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
18
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
19
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
20
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
Daily Top 2Weekly Top 5

आचारी व्यवसायाला लागले कोरोनाचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:00 IST

कोरोनामुळे संपूर्ण जग जागीच थांबले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन घोषित केले. त्यामुळे मागील तीन महिन्यांपासून स्वयंपाकी व्यवसाय ठप्प आहे. लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यांत शासनाने नियमांमध्ये शिथीलता दिल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी खबरदारी म्हणून समारोह कौटुंबिक सोहळयांवर अटी लादून दिल्या आहेत.

ठळक मुद्देलग्नसमारंभ रद्द : व्यवसायावर संक्रात आल्याने ओढवले संकट, उदरनिवार्हाचा प्रश्न ऐरणीवर

लोकमत न्यूज नेटवर्कगिरड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्याने छोट्या व्यावसायिकांना मोठी कसरत करावी लागत आहे . विविध मोठ्या समारंभात रुचकर भोजन बनविणाऱ्या आचाऱ्यांच्या जीवनात तर मिठाचा खडाच पडला आहे. त्यामुळे उदरनिर्वाहाचे मोठे संकट स्वयंपाकींसमोर आले असून आचारी व्यवसायाला कोरोनाचे ग्रहण लागल्याची स्थिती निर्माण झाली आहे.कोरोनामुळे संपूर्ण जग जागीच थांबले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन घोषित केले. त्यामुळे मागील तीन महिन्यांपासून स्वयंपाकी व्यवसाय ठप्प आहे. लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यांत शासनाने नियमांमध्ये शिथीलता दिल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी खबरदारी म्हणून समारोह कौटुंबिक सोहळयांवर अटी लादून दिल्या आहेत.समारंभात रुचकर भोजन बनविणाºया आचारींच्या व्यवसायाला कोरोनाचे ग्रहण लागले आहे.त्यामुळे सध्या हा व्यवसाय कोलमडल्याचे चित्र आहे. मोठ्या समारोहात किंवा लग्नसोहळ्यात स्वयंपाकींची रेलचेल असते. आलेले पाहुणे रुचकर भोजन करून तृप्त व्हावे, अशी भावना असते. परंतु, यंदा समारोहांवर बंदी असल्याने स्वयंपाकी आर्थिक अडचणीत सापडले आहे. शासनाने याचा विचार करून त्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी प्रयत्न करण्याची मागणी स्वयंपाकींकडून करण्यात येत आहे.उदरनिर्वाहची घडी विस्कटलीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर हळद आदी कार्यक्रम घरीच होत आहेत . शासनाच्या नव्या नियमानुसार अल्प प्रमाणात विवाह सोहळे पार पडत आहेत.परंतु, जेवणाचे ऑर्डर मिळत नाही. तीन महिन्यांपासून व्यवसाय थंडबस्त्यात आहे. येथील २५ स्वयंपाकी आणि त्यांच्या सोबतचे मदतनीस यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर होता. परंतु, सार्वजनिक सोहळ्यांवर बंदी असल्याने मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे सुरू असल्याचे स्वयंपाकी बाळा बावणे यांनी सांगितले. आमचाही विचार करून आर्थिक मदत करण्यात यावी, अशी मागणी स्वयंपाकींकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या