शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक वनहक्क प्राप्त १६५ गावांचे अधिवेशन

By admin | Updated: June 20, 2016 01:51 IST

नई तालीम समितीच्या शांती भवनात सामूहिक वनहक्क प्राप्त विदर्भातील १४५ व कोकणातील २० गावांचे दोन दिवसीय ....

नई तालीम समितीत कार्यक्रम : वनहक्क समिती व एनजीओंना येणाऱ्या समस्या व आराखड्यावर चर्चासेवाग्राम : नई तालीम समितीच्या शांती भवनात सामूहिक वनहक्क प्राप्त विदर्भातील १४५ व कोकणातील २० गावांचे दोन दिवसीय प्रथम वार्षिक अधिवेशन पार पडले. याप्रसंगी राज्य आदिवासी विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, युएनडीपी दिल्लीचे सुनील चौधरी, अमरावतीचे प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक संजीव गौड, नागपूर अतिरिक्त आदिवासी आयुक्त माधवी खोडे, गोंदियाचे उपवन संरक्षक जितेंद्र रामगावकर, कार्यकारी संचालक दिलीप गोडे, खोज संस्थेच्या पौर्णिमा उपाध्याय आदी उपस्थित होते.चौधरी यांनी गावस्तरावर ग्रामसभेद्वारे वनहक्काचे कार्य सुरू आहे. सामूहिक वन हक्काचे कार्य राज्यात यशस्वीरित्या सुरू आहे. अन्य राज्यांनी महाराष्ट्राचा आदर्श घेऊन कार्य करावे. गावातील समिती व एनजीओ यांनी मिळून कामात सुसंगतता आणावी. प्रशिक्षणाची व्यवस्था करावी, असे सांगितले. खोडे यांनी प्रत्यक्ष क्षेत्रात कार्यरत कार्यकर्त्यांसाठी कार्यशाळा घ्यावी. एनजीओ व समिती यांचा थेट संबंध व संवाद नागरिकांशी असल्याने समस्या व अडचणींची जाणीव असते. याची सोडवणूक अधिकाऱ्यांमार्फत करावी. वन संरक्षण व उत्पादनाचा विचार करता सण वेगळ्या पद्धतीने साजरे करण्याची नवीन परंपरा निर्माणाचे काम गावांत व्हावे, असे सांगितले. देवरा यांनी वन हक्काबाबत जागृती निर्माण झाली. येथे चर्चा, आढावा, विकास कार्य व आराखडा यावर मते मांडली. नागरिकांत प्रत्यक्ष कार्य समिती, एनजीओ करते. शासनाचा तो दुवा आहे. वन, आदिवासी व ग्रामीण विकास विभाग ठोस निर्णय घेऊन मदत करेल, असे सांगितले. सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समिती व हक्क अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी, धोरणात्मक बदल, आराखडे ३ वर चर्चा करण्यात आली. गडचिरोली, अमरावती, नागपूर, गोंदिया, यवतमाळ येथील उपजीविका मंचने समस्या व उपायांवर सादरीकरण केले. वनहक्क कायद्याखालील ग्राम संरक्षण गौण उपज गोळा करणाऱ्या देवरी तालुक्यातील नऊ गावांतील गट ग्रामसभा स्थापन करून तेंदूपत्ता कामगार, मजुरांना धनादेश देण्यात आले. प्रास्ताविक उपाध्याय यांनी केले. संचालन डॉ. मोघे यांनी केले तर आभार मृणालीनी यांनी मानले. गोंदिया, अमरावती, गडचिरोली, यवतमाळ, रायगड व ठाणे जिल्ह्यातील १४५ गावांतील प्रतिनिधी सहभागी झाले. वासुदेव कुडमते, गोविंद पिसे, महादेव गिल्लुरकर, गौतम नितनवरे आदींनी सहकार्य केले.(वार्ताहर)