शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची संततधार; जलाशयांच्या पातळीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 05:00 IST

जिल्ह्यात सर्वदूर सुरु असलेल्या पावसामुळे बुधवारी सायंकाळपासून समुद्रपूर तालुक्यातील लालनाला प्रकल्पाचे पाच गेट २५ से.मी. उघडण्यात आले असून त्यातून ६४.२५ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तसेच नांद प्रकल्पाचीही पातळी वाढल्याने सात गेट ३० से.मी.ने उघडले आहे. पोथरा प्रकल्पात ९५.३० टक्के जल संचय झाल्याने सांडव्यावरुन पाणी वाहत असल्याने परिसरातील नदी, नाल्यांना पूर आला आहे.

ठळक मुद्देपोथरा ओव्हर फ्लो : वीस गावांचा संपर्क तुटला, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/समुद्रपूर : गेल्या दोन आठवड्यापेक्षा अधिक काळापासून जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षा होती. बुधवारी पहाटे सर्वदूर पावसाने हजेरी लावल्यानंतर गुरुवारी दुपारपासून सततधार कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मध्यम व मोठ्या जलाशयांची पाणी पातळी वाढल्याने नदी-नालेही फुगले आहे. समुद्रपूर तालुक्यातील पोथरा प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने वीस गावांचा संपर्क तुटला. यासोबतच जिल्ह्यातील इतरही जलाशयाची पातळी वाढल्याने पाटबंधारे विभागाकडून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.जिल्ह्यात सर्वदूर सुरु असलेल्या पावसामुळे बुधवारी सायंकाळपासून समुद्रपूर तालुक्यातील लालनाला प्रकल्पाचे पाच गेट २५ से.मी. उघडण्यात आले असून त्यातून ६४.२५ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तसेच नांद प्रकल्पाचीही पातळी वाढल्याने सात गेट ३० से.मी.ने उघडले आहे. पोथरा प्रकल्पात ९५.३० टक्के जल संचय झाल्याने सांडव्यावरुन पाणी वाहत असल्याने परिसरातील नदी, नाल्यांना पूर आला आहे. आर्वी तालुक्याती निम्न वर्धा प्रकल्पही ७०.६४ टक्के भरल्याने पाटबंधारे विभागाने सायंकाळी ६ वाजतापासून तीन गेट ५ से.मी. उघडण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील जलाशयातून पाणी सोडले जात असल्याने सर्वत्र पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. काही भागात सकाळपासून तर कुठे दुपारपासून संततधार सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच शेतीचेही कामे थांबली असून नदीकाठच्या शेतामध्ये पाणी साचले.

कोरा परिसरात गावांत शिरले पुराचे पाणी- कोरा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून परिसरातील नदी, नाल्यांना दहा ते बारवेळा पूर आला आहे. लालनाप्रकल्पाचे पाणी सोडल्याने नदी, नाले ओसंडून वाहत आहे. त्यामुळे परिसरातील शेतासह गावातही पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुख्य रस्त्यांना तलावाचे स्वरुप प्राप्त झाल्याने येण्या-जाण्याचा मार्गही काही काळ बंद झाला होता.

वडगाव-पिंपळगाव मार्गावरील वाहतूक ठप्प- समुद्रपूर तालुक्यातील पोथरा नदीला पूर आल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. सकाळी कामानिमित्य बाहेरगावी गेलेले नागरिकांना अलीकडच्या गावातच थांबावे लागले. वडगांव ते पिंपळगाव मार्गाची वाहतूक थांबली असून सायगव्हाण, सावंगी, लोखंडी व पिंपळगाव या गावाचा संपर्क तुटला. दोन व्यक्ती वाहून गेल्याने तहसीलदार राजू रणवीर, ना. तह. किरसान, ठाणेदार हेमंत चांदेवार व धमेंद्र तोमर शोध घेत आहे. 

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर