शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

भविष्य निर्वाह निधी कपातीचा ताळमेळ जुळेना

By admin | Updated: October 29, 2014 22:54 IST

शिक्षकांच्या वेतनातून दरमहा कपात होऊनही भविष्य निर्वाह निधीच्या रकमेचा लेखा विवरण पत्रात ताळमेव लागत नव्हता़ या समस्येबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी

वर्धा : शिक्षकांच्या वेतनातून दरमहा कपात होऊनही भविष्य निर्वाह निधीच्या रकमेचा लेखा विवरण पत्रात ताळमेव लागत नव्हता़ या समस्येबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी संतोष वोहूळ यांच्याशी चर्चा केली. यावेळी शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांच्यासह शिक्षक समितीचे विजय कोंबे, नरेश गेडे, नरेंद्र गाडेकर आदी उपस्थित होते़शिक्षकांच्या वेतनातून भविष्य निर्वाह निधीची मासिक वर्गणी नियमित कपात केली जाते. २०१२-२०१३ या आर्थिक वर्षाच्या कपातीचे विवरण पत्र मागील काही दिवसांपूर्वी शिक्षकांना मिळाले. यात सर्वच शिक्षकांच्या विवरण पत्रात तीन ते पाच महिन्यांच्या कपात रकमा दर्शविल्या नाहीत. या संबंधाने शिक्षक समितीने दिलेल्या निवेदनानंतर मुख्य लेखा तथा वित्त अधिकाऱ्यांनी शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेस बोलविले होते़ पंचायत समितीकडून येणारे कपातीचे धनादेश वा चालान अनेक महिने वित्त विभागात येत नसल्याने कोटीच्या रकमा २०१२-१३ च्या विवरण पत्रात नोंदविल्या नसल्याचे लेखा विभागाने स्पष्ट केले़ पुढील दोन महिन्यांत भविष्य निर्वाह निधी २०१३-१४ चे विवरण पत्र दिले जाणार आहे़ यात मागील सर्व त्रूटींची पूर्तता केली जाईल, असेही मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी संतोष वोहूळ यांनी सांगितले. परिभाषित अंशदायी पेन्शन कपातीचा शिक्षक संवर्गाचा मागील हिशेब पूर्ण झाला आहे; पण ग्रामसेवकांच्या कपातीचे चालान तीन पंचायत समित्यांनी पाठविलेले नाही. यामुळे हिशेबाचे विवरण देण्यास विलंब होत असल्याचे लेखा अधिकाऱ्यांनी सांगितले.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीकडून धनादेश पाठविण्यास झालेल्या विलंबामुळे होणाऱ्या व्याजाच्या नुकसान भरपाईची मागणी केली़ शिवाय विलंब करणाऱ्या पं़स़ मधील दोषींवर शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी केली. परिभाषित अंशदायी पेन्शन योजनेत येणाऱ्या शिक्षकांचे हिशेबपत्र शीघ्र द्यावे, त्यांचे व्याज वा सममूल्य रक्कम खात्यावर जमा करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली़ पुढील काही काळात भविष्य निर्वाह निधीचा हिशेब आॅनलाईन देण्यासाठी आवश्यक ती कारवाई सुरू असून भविष्यात हिशेबाच्या तक्रारी येणार नाहीत, असेही वोहूळ यांनी सांगितले. शिक्षकांच्या वेतनातील विलंब टाळण्यासाठी कोषागार कार्यालयाकडून धनादेश प्राप्त होताच त्याच दिवशी वित्ताप्रेषण पाठविले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली़ यावेळी शिक्षणाधिकारी काटोलकर, वरिष्ठ लेखा अधिकारी संदीप ओव्हाळ, शैलेश काळे, सहायक लेखा अधिकारी यादव, कनिष्ट प्रशासन अधिकारी आशिष दहीवडे, अशोक पवार, सोमंता फुटाणे आदी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)