शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीत शेतमाल तारण योजनेला प्रारंभ

By admin | Updated: October 30, 2016 00:57 IST

शेतकऱ्यांना आर्थिक गरजेपोटी शेतमालाची काढणी सुरू झाल्यानंतर तो बाजार आवारात विक्रीसाठी आणावा लागतो.

शेतकऱ्यांना सुविधा : ६ टक्के दराने कर्जहिंगणघाट : शेतकऱ्यांना आर्थिक गरजेपोटी शेतमालाची काढणी सुरू झाल्यानंतर तो बाजार आवारात विक्रीसाठी आणावा लागतो. यामुळे शेतमालाचे बाजार भाव खाली येतात. आर्थिक निकड असल्याने मिळेल त्या भावात शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकावा लागतो. सदर शेतमाल साठवणूक करून काही कालावधीनंतर बाजारात विक्रीसाठी आणल्यास वाढलेल्या भावाने विक्री करून अधिक रक्कम मिळू शकते. ही बाब लक्षात घेत कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतमाल तारण योजनेस प्रारंभ केला. सद्यस्थितीत सोयाबीनची खरेदी आधारभूत किंमतीच्या आत होत आहे. शेतकऱ्यांना शेतमाल कमी किंमतीत विकावा लागू नये म्हणून १५-२० वर्षांपासून सोयाबीन, तूर, चना, गहू व हळद या शेतमालाकरिता तारण योजना राबविली जाते. सदर योजना कृषी पणन मंडळाच्या शर्ती व अटीस अधीन राहून बाजार समितीमार्फत राबविण्यात येत आहे. त्या दिवशीचे बाजार भाव विचारात घेऊन प्रत्यक्षात तारण ठेवलेल्या शेतमालाची किंमत ही तत्कालीन बाजार भाव वा शासनाने जाहीर केलेली किंमत यापैकी जी कमी असेल ती ठरविण्यात येते. त्या बाजार भावानुसार किंमतीच्या ७५ टक्के गहू सोडून इतर शेतमालाकरिता तर गव्हाकरिता ५० टक्के रक्कम तारण कर्ज म्हणून ६ महिन्यांच्या मुदतीकरिता ६ टक्के व्याज दराने देण्यात येते. सदर योजनेंतर्गत दिलेल्या कर्जाचा भरणा १८० दिवसांच्या आत करणे आवश्यक आहे. समितीच्या गोदामांमध्ये केवळ सोयाबीनची साठवणूक केली जाते. शेतकऱ्यांनी आर्थिक गरजेपोटी मिळेल त्या भावात शेतमाल विकण्यापेक्षा वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये साफसफाई करून साठवणूक करावी. महामंडळाकडून मिळणारी वखार पावती, चालू वर्षाचा सातबारा, तलाठ्याचे संबंधित शेतमालाचे पीक पेरापत्रक, १०० रुपयांचा स्टॅम्प व ओळखपत्र समिती कार्यालयात जमा करावे तथा कर्ज मागणीचा प्रस्ताव भरून द्यावा. प्रस्ताव सादर केल्यापासून ४८ तासांत तारण कर्जाची रक्कम समिती शेतकऱ्यांना धनादेशाद्वारे अदा करते. ही योजना राबविण्यासाठी समितीद्वारे पाच कोटी रुपयांचा तारण कर्ज प्रस्ताव कृषी पणन मंडळास सादर करण्याबाबत सोमवारी संचालक मंडळाच्या सभेत निर्णय घेण्यात आला. यात गुरूवारी पाच शेतकऱ्यांद्वारे सादर सोयाबीन तारण कर्ज प्रस्तावाच्या अनुषंगाने ४ लाख २७ हजार रुपये वितरीत करण्यात आले. शेतकऱ्यांनी शेतमाल तारण योजनेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन बाजार समितीने केले आहे.(तालुका प्रतिनिधी)