झेडपीच्या संकेतस्थळावर जुन्या माहितीचा संचय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 06:00 AM2020-02-27T06:00:00+5:302020-02-27T06:00:20+5:30

इंटरनेटच्या युगात कार्यालयाची माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी याकरिता सर्व शासकीय कार्यालयांप्रमाणे जिल्हा परिषद कार्यालयाचे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. मात्र, या संकेतस्थळावर माहिती अपडेट करण्याचा विसर कर्मचाऱ्यांना पडल्याचे दिसून येत आहे. हे संकेतस्थळ उघडल्यास त्याच्या होमपेजवरच असलेले जिल्हापरिषद इमारतीतचे छायाचित्रच चुकीचे दिले आहे.

Collection of old information on ZP's website | झेडपीच्या संकेतस्थळावर जुन्या माहितीचा संचय

झेडपीच्या संकेतस्थळावर जुन्या माहितीचा संचय

Next
ठळक मुद्देअपडेट करण्याकडे दुर्लक्ष : नागरिकांना चुकीची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पारदर्शक, उत्तरदायी आणि संवेदनशील प्रशासनाव्दारे ग्रामीण जनतेचे सबलीकरण करणे, त्यांचे जीवनमान उंचाविणे आणि ग्रामीण भागाचा विकास करणे, हे उद्दिष्ट्ये घेऊन कार्यरत असलेल्या जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जुन्याच माहितीचा संचन कायम आहे. २०१७ पासून या संकेतस्थळाला अपडेट केले नसल्याने जिल्हा परिषद प्रशासनाकडून चुकीची माहिती इतरांपर्यंत पोहचविली जात आहे.
इंटरनेटच्या युगात कार्यालयाची माहिती एका क्लिकवर उपलब्ध व्हावी याकरिता सर्व शासकीय कार्यालयांप्रमाणे जिल्हा परिषद कार्यालयाचे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. मात्र, या संकेतस्थळावर माहिती अपडेट करण्याचा विसर कर्मचाऱ्यांना पडल्याचे दिसून येत आहे. हे संकेतस्थळ उघडल्यास त्याच्या होमपेजवरच असलेले जिल्हापरिषद इमारतीतचे छायाचित्रच चुकीचे दिले आहे.
त्यानंतर वार्षिक प्रकाशन अहवाल २०१३-१४ चा तर बजेट २०१५-१६ चे दिले आहे. सोबतच या संकेतस्थळावरील झेडपी मेंबर यावर क्लिक केले असता झेडपी कमिटी व झेडपी मेंबर या दोन विंडो उघडतात. मात्र त्यावरील झेडपी कमिटी आणि मेंबरची यादी ही २०१७ चीच कायम दिसून येत आहे.
त्यामुळे आताचे जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती कोण? याची माहिती मिळू शकत नाही. तसेच कमिट्यांचीही माहिती जुनीच असल्याने अनेकांना अडचणीचे जात आहे. या संकेतस्थळावरील बरीचशी माहिती जुनीच असल्याने याकडे जिल्हा परिषद प्रशासनाने अद्यापही लक्ष दिले नाही. त्यामुळे या संकेतस्थळाच्या माध्यमातून जिल्हापरिषदेचा मागासलेपणा निदर्शनास येत आहे.

ग्रामपंचायत अन् लोकसंख्याही चुकीची
ग्रामपंचायतीच्या विकासाचा आधार असलेल्या जिल्हा परिषदेकडूनच संकेतस्थळावर ग्रामपंचायतींची चुकीची आकडेवारी दर्शविण्यात आली आहे. या संकेतस्थळावर जिल्ह्यात ५१७ ग्रामपंचायती असल्याची नोंद आहे. मात्र, सध्या जिल्ह्यात ५२० ग्रामपंचायती आहे. तसेच दर्शविलेली लोकसंख्याही २००१ च्या जनगणनेनुसारच नमुद करण्यात आली आहे. आता लोकसंख्येत बरीच वाढ झाली तरीही या संकेतस्थळावर ही माहिती अपडेट केली नसल्याने चुकीची माहिती दिली उपलब्ध होत आहे.

जिल्हा परिषदच्या लेखी १६ विभाग
जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर आजही १६ विभाग दर्शविले जात असून त्यामध्ये सोळावा क्रमांक जलस्वराज विभागाचा आहे. वास्तविक पाहता जलस्वराज हा प्रकल्प कधीचाच गुंडाळला असून तो विभाग ग्रामीण पाणीपुरवठा विभागात समाविष्ट करण्यात आला आहे. तरीही संकेतस्थळावर जलस्वराज हा १६ वा विभाग कायम असल्याने कार्यपद्धतीवर आश्चर्य व्यक्त होत आहे.

Web Title: Collection of old information on ZP's website

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.