शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनामुळे नागरिक त्रस्त

By admin | Updated: May 4, 2017 00:47 IST

सर्कसपूर, राजापूर, कर्माबाद, निंबोली (शेंडे), नांदपूर, धनोडी, साठोडा, बेनोडा, एकलारा, अंबिकापूर, भाईपूर, हैबतपूर,

वाठोडा सर्कलमधील प्रकार : ग्रामस्थ धडकले महावितरणच्या कार्यालयावर आर्वी : सर्कसपूर, राजापूर, कर्माबाद, निंबोली (शेंडे), नांदपूर, धनोडी, साठोडा, बेनोडा, एकलारा, अंबिकापूर, भाईपूर, हैबतपूर, बाजारवाडा, खुबगाव या वाठोडा जि. प. सर्कल परिसरात महावितरणच्यावतीने चक्क १८ तासाचे भारनियमन सुरू आहे. परिणामी, या भागातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांची समस्या लक्षात घेता सुरू असलेले भारनियमन तात्काळ बंद करण्यात यावे, या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी महावितरणचे कार्यालय गाठून महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यांना निवेदन सादर केले. निवेदनातून, सुरू असलेल्या भारनियमानामुळे नागरिक मेटाकुटीस आले आहेत. या भागातील विद्युत पुरवठा वेळी-अवेळी खंडीत केला जातो. त्यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन प्रभावीत झाले आहे. विद्युत पुरवठा राहत नसल्याने नळयोजनेद्वारे केला जाणारा पाणीपुरवठा प्रभावीत झाली असून कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात विद्युत पुरवठा खंडीत करण्यात येत असल्याने लहान मुलांसह वयोवृद्ध व रुग्णांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. विद्युत पुरवठा सुरळीत नसतानाही या भागात महावितरणच्यावतीने वसुली नियमित सुरू असल्याचा आारोप निवेदनातून करण्यात आला आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे एफ ग्रुपमध्ये या परिसराला टाकण्यात आले आहे. उत्कृष्ट वसुली असल्याने वसुलीसाठीचा पुरस्कार मिळाला असताना हा सर्कल एफ ग्रुप मध्ये कसा असा सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. वेळी-अवेळी सुरू असलेले भारनियमन तात्काळ बंद करण्यात यावे, अशी मागणी महावितरणच्या अभियंत्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना पंचायत समितीचे उपसभापती धर्मेंद्र राऊत, सरपंच संघटनेचे अध्यक्ष निखील कडू, प्रमोद चव्हाण, सरपंच दिनेश डेहनकर, उपसरपंच किशोर काळे, अश्विन शेंडे, अरूण चिखले, रोशन राऊत, निलेश गायकवाड, सागर ठाकरे, अफसर खान, मोहन शेंद्रे, संगीता बारसागळे, पुष्पा शेंद्रे, सुनंदा वाघाडे, अंजना नेवारे, विजय वाघाडे, विनायक बारसागळे, भानदास मुरके, गजेंद्र कोहरे, रामदास कडू आदींची उपस्थिती होती. मागणीचा विचार न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देताना झालेल्या चर्चेदरम्यान संतप्त नागरिकांनी होत असलेल्या भारनियमनामुळे विद्युत अभावी निर्माण होणाऱ्या समस्यांचा पाढाच वाचला. शेवटी होत असलेल्या मागणीवर योग्य कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन मिळाल्याने संतप्त नागरिक थोडे शांत झाले. त्यांनी मागणीचा विचार न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.(तालुका प्रतिनिधी) कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळेच परिसर एफ ग्रुपमध्ये या भागातील नागरिक विजेचे देयक नियमित अदा करतात. परिणामी, येथील सर्कलला उत्कृष्ट वसुलीचा पुरस्कारही मिळाला आहे. उत्कृष्ट वसुलीचा पुरस्कार मिळणारा परिसर एफ ग्रुपमध्ये कसा असा सतप्त सवाल या भागातील नागरिक विचारत असून महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळेच या परिसराचा एफ ग्रुपमध्ये समावेश झाल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.