शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

सात दशकांपासून शहर विकासापासून वंचितच

By admin | Updated: May 4, 2017 00:51 IST

कामगारांचे शहर अशी ओळख असलेल्या पुलगाव शहरात सर्व भौगोलिक सुविधा असताना विकासाच्या दृष्टीने ठोस पावले

एकही नवीन उद्योग नाही : जुन्या उद्योगांनाही घरघर, रोजगार संधीची प्रतीक्षा कायमच पुलगाव : कामगारांचे शहर अशी ओळख असलेल्या पुलगाव शहरात सर्व भौगोलिक सुविधा असताना विकासाच्या दृष्टीने ठोस पावले उचचल्या गेली नाही. त्यामुळे मागील सात दशकात हा परिसर विकासाच्या दृष्टीने उपेक्षितच राहिला आहे. काँग्रेसने विकास होऊ दिला नाही, असे म्हणणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडून शहराच्या विकासाकरिता कोणत्या उपाययोजना केल्या जातात याकडे शहर वासीयांचे लक्ष लागले आहे. राज्यातील नव्हे तर देशाच्या राजकारणात महत्वाचे स्थान मिळविणारे सक्षम नेतृत्व या क्षेत्राने दिले आहे. परंतु शहराच्या विकासाकडे मात्र सर्वच लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविल्याचे दिसून येते. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीशांच्या राजवटीत १८८९ साली पुलगाव कॉटन मील व १९४२ साली स्थापन झालेला केंद्रीय दारूगोळा भांडार सोडले तर या भागात सात दशकात कुठलाही दुसरा मोठा उद्योग उभा राहिलेला नाह. मुंबई-हावडा या रेल्वे मार्गावर असणारे कवठा हे गाव इंग्रज राजवटीत जिल्ह्याचे मुख्यालय होते. गावालगतच बारामाही वाहणारी वर्धा नदी आहे. परिसरातील भौगोलिक परिस्थिती पाहून इंग्रज शासनाने १९६५ साली या नदीवर रेल्वे पुलाची निर्मिती करीत या गावाला ‘ब्रीजटाऊन’ पुलगाव हे नाव दिले. पुढे भौगोलिक परिस्थिती व दळणवळणाची व्यवस्था पाहून १८८९ साली नागपूरच्या बुटी परिवाराने येथे कापड गिरणी सुरू करून विकासाची मुहूर्तमेढ रोवली. पुढे हा उद्योग भरभराटीस येवून ३ हजार ५०० कामगारांचा मोठा वस्त्रोद्योग झाला. या शहराचे महत्व व उपलब्ध असलेली भौगोलिक परिस्थिती इंग्रजाचा कळली. म्हणूनच त्यांनी १९४२ साली शहरात देशातील सरंक्षण विभागाचा सर्वात मोठे केंद्रीय दारूगोळा भांडाराची स्थापना करून शहराच्या विकासाला काही प्रमाणात दिशा दिली. मात्र गत काही दशकात शहाराच्या विकासाची गती मंदावल्याचे दिसते. पुलगाव येथून नागपूर-मुंबई द्रुतगती मार्ग, हैदराबाद-भोपाळ महामार्ग जातो. मात्र येथे एकही मोठा उद्योग उभारलेला नाही. विकासाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या या शहराचा विकास करणे तर सोडाच मात्र पुलगाव कॉटन मील व नॅरोगेज रेल्वेमार्ग बंद करून शासनाने शहराच्या विकासाला पाने पुसली आहे. या शहरालगत असलेल्या शासकीय पडीत जागेवर औद्योगिक वसाहत स्थापन व्हावी म्हणून तीन दशकापासून शहरावासीयांनी साकडे घातले आहे. परंतु येथील औद्योगिक वसाहतीचे घोडे पेंड खावून पडले ते तीन दशकापाूसन उठलेच नाही. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी अल्प आहे. याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. येथील भौगोलीक सुविधांची उपलब्धता पाहता विकासाची प्रतीक्षा शहरवासीयांना आहे. (तालुका प्रतिनिधी)