शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकीच्या कोंडीने नागरिक त्रस्त

By admin | Updated: May 14, 2017 00:54 IST

खडकी येथे रस्त्याच्या कडेला चालक आपल्या ताब्यातील वाहने रस्त्याच्या मधोमध उभी करतात.

मोठ्या अपघाताची भीती : वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क केळझर : खडकी येथे रस्त्याच्या कडेला चालक आपल्या ताब्यातील वाहने रस्त्याच्या मधोमध उभी करतात. परिणामी, येथे नेहमी वाहतुकीची कोंडी होते. हा प्रकार मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. येथे वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी आहे. मध्यंतरी एक वाहतूक पोलीस नेमण्यात आला होता; पण काही दिवसांपासून ते कर्तव्य बजावत नसल्याने वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. यामुळे नागरिकांना मनस्ताप होत आहे. शनिवारी सकाळी येथील संकटमोचन हनुमान मंदिराच्या अगदी समोर सीजी ०४ जेसी ६६५४ क्रमांकाचा ट्रेलर महामार्गावर नादुरूस्त झाल्याने उभा करण्यात आला होता. यामुळे वर्धा-नागपूरकडे जाणाऱ्या वाहनांच्या रांगा महामार्गाच्या दुतर्फा लागून वाहतुकीची काही तास कोंडी झाली होती. परिणामी, प्रवाशांना नामक मनस्ताप सहन करावा लागला. मंदिर परिसरात रस्त्याच्या दुतर्फा व्यावसायिकांनी अतिक्रमण करून आपली दुकाने थाटली आहेत. यामुळे वाहनतळाकरिता जागा शिल्लक राहिली नाही. सदर अतिक्रमण काढावे, अशी मागणी अनेकदा नागरिकांनी संबंधित विभागाकडे केली; पण याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे येथे दर्शनाकरिता थांबा घेणारे प्रवासी त्यांची वाहने रस्त्यावर उभी करतात. यामुळे वाहतुकीची कोंडी होते. खडकी येथे वाहनतळाची निर्मिती करावी, अशी मागणी नागरिकांनी अनेकदा संबंधित विभागाकडे केली; पण अद्यापही कार्यवाही करण्यात आली नाही. प्रशासनाने याकडे लक्ष देत अतिक्रमण हटवावे व वाहनतळाची व्यवस्था करून वाहतुकीची समस्या निकाली काढावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. राज्यमार्गावरील रहदारीला होतो अडथळा, रात्रीचा धोका अधिक नागपूर ते यवतमाळ हा राज्य मार्ग आहे. दरम्यान, खडकी हे प्रत्येक वाहन चालक व प्रवाशांकरिता थांब्याचे स्थळ झाले आहे. या मंदिरात पवनसुताचे दर्शन घेण्याकरिता प्रत्येक प्रवासी थांबतो. याचाच फायदा घेण्याकरिता रस्त्याच्या दोन्ही कडेला अतिक्रमण वाढले असून दुकाने थाटण्यात आली आहे. दुकाने आणि रस्त्यालगत उभी राहणारी वाहने, यामुळे राज्य मार्गावरील अवजड वाहनांना निमूळता रस्ता मिळतो. रात्रीच्या वेळी तर वाहने दिसत नसल्याने अपघाताचा धोका अधिक असतो. याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.