शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंट बंधाऱ्यांची दैना

By admin | Updated: May 6, 2017 00:34 IST

समुद्रपूर तालुका कृषी कार्यालयाच्या माध्यमातून सन २००८-०९ मध्ये गोविंदपूर-नारायणपूर या नाल्यावर

कृषी विभागाचा भोंगळ कारभार नारायणपूर : समुद्रपूर तालुका कृषी कार्यालयाच्या माध्यमातून सन २००८-०९ मध्ये गोविंदपूर-नारायणपूर या नाल्यावर विदर्भ पॅकेज अंतर्गत साखळी पद्धतीने सिमेंट बंधारे बांधण्यात आले होते. या बंधाऱ्यांची आता दैना झाली आहे. शिवाय जलयुक्त शिवारात या नाल्याचे सरळीकरण झाल्याने येथे पाण्याचा प्रवाह वाढणार आहे. परिणामी या तुटक्या बंधाऱ्यातून पाणी वाहून ते आसपासच्या शेतकऱ्यांच्या शेतात शिरण्याची शक्यता असल्याने पावसाळ्यापूर्वी या बंधाऱ्याची डागडुजी करण्याची मागणी होत आहे. ज्या नाल्यावर हा बंधारा होता त्या नाल्याचे आता ‘जलयुक्त शिवार’ अभियानात खोलीकरण व नाला सरळीकरण करण्यात आले. यावर शासनाचा मोठा निधी खर्च झाला; परंतु सदर नाल्यावरील सिमेंट बंधारे (चेक डॅम) मात्र शेवटची घटका मोजत आहे. याबाबत तालुका कृषी अधिकारी समुद्रपूर यांना विचारणा केली असता दुरूस्तीकरिता कोणताही निधी नसल्याचे सांगितले. सदर नाला खोलीकरण झाला असून चेक डॅमचे काम पूर्ण न केल्यास नाल्याजवळील शेतकऱ्यांना त्याचा त्रास होऊ शकतो. यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत तालुक्याच्या अधिकाऱ्यांना काम पूर्ण करण्याच्या सूचना कराव्या अशी मागणी आहे.(वार्ताहर)