शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

सीसीआयकडे ३० कोटींचे चुकारे थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 05:00 IST

हिंगणघाट तालुक्यात सीसीआयने आतापर्यंत १८ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२० पर्यंत या एक महिन्याच्या कालावधीत हिंगणघाटला तीन केंद्रातून तर वडनेरमध्ये एका केंद्रावर तीन हजाराच्यावर शेतकऱ्यांकडून जवळपास ५५ हजार क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. याच कापसाचे जवळपास ३० कोटी रुपये सीसीआयकडे थकीत असून शेतकऱ्यांना त्यांचे चुकारे अद्याप मिळालेले नाही.

ठळक मुद्देकापूस उत्पादकांची वाढली चिंता : लॉकडाऊनचा बळीराजाला जबर फटका

भास्कर कलोडे।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : शासनाद्वारा हमी भावात खरेदी केलेल्या ३० कोटींपेक्षा जास्त कापसाचे चुकारे दीड महिन्यांपासून सीसीआयकडे थकीत आहे. तर पंधरा दिवसांपासून कापूस खरेदी बंद असल्याने घरी पडून असलेल्या कापसाचे करायचे काय या विचाराने शेतकरी सध्या आहे. शासनाने त्वरित थकीत चुकारे देत कापूस खरेदी करून करावी अशी मागणी आहे.हिंगणघाट तालुक्यात सीसीआयने आतापर्यंत १८ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२० पर्यंत या एक महिन्याच्या कालावधीत हिंगणघाटला तीन केंद्रातून तर वडनेरमध्ये एका केंद्रावर तीन हजाराच्यावर शेतकऱ्यांकडून जवळपास ५५ हजार क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. याच कापसाचे जवळपास ३० कोटी रुपये सीसीआयकडे थकीत असून शेतकऱ्यांना त्यांचे चुकारे अद्याप मिळालेले नाही. यावर्षी खुल्या बाजारात कपाशीचे क्विंटलमागे ४,८०० रुपये दर असताना केंद्र शासनाकडून हमीदर ५ हजार ५५० रुपये देण्यात आला आहे. क्विंटलमागे हजार रुपयापर्यंत फरक पडत असल्याने यावर्षी शेतकºयांचा सीसीआयकडे हमी दरात कापूस विक्री करण्यासाठी ओढा आहे.सुरुवातीला सीसीआयद्वारे खरेदी केलेल्या कापसाचे चुकारे पाच ते सात दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत होते; पण नंतर हा कालावधी वाढत जाऊन आता तब्बल दीड महिन्यापासून शेतकऱ्यांना कापसाचे चुकारे सीसीआयकडून देण्यात आलेले नाही. सीसीआयने कापूस खरेदी सुरू केली तेव्हा उच्च प्रतीच्या कपाशीला क्विंटलमागे ५,५५० रुपये दर दिला जात होता.नंतर हाच दर ५,४५० रुपयांवर स्थिरावला. तालुक्याचा विचार करता कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे येथे १९ मार्च पासून सीसीआयची कापूस खरेदी बंद केली आहे. मागील पंधरा दिवसांपासून सीसीआयची कापूस खरेदी बंद असून गत वर्षी याच कालावधीत ६५ हजार १२२ क्विंटल कापसाची खरेदी झाली होती. मध्यतरी झालेल्या अवकाळी पावसासह वादळीवाºयामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पूर्वीच शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशातच कापसाचे चुकारे वेळीच मिळत नसल्याने तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.काहींच्या बँक खात्यात जमा झाली रक्कम१८ फेब्रुवारीपर्यंत कापूस विक्री केलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांचे चुकारे त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत. मात्र, १८ मार्चपर्यंत या एक महिन्याच्या कालावधीत सुमारे तीन हजार शेतकऱ्यांनी विकलेल्या ५५ हजार क्विंटल कापसाचे ३० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्याप जमा झालेले नाही.कांही कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कागदपत्रातील त्रुटी, काहींचे एस बँके द्वारा व्यवहार, संगणकीय लिंक, तसेच लॉक डाऊन आदी अडचणीमुळे शेतकऱ्यांना कापसाचे चुकारे मिळण्यास विलंब झाला आहे. परंतु २९ फेब्रुवारीपर्यंतचे चुकारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बुधवारपर्यंत तर उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच कापसाचे चुकारे देण्यात येईल.- दीपक पाटोले, केंद्र प्रभारी प्रमुख, सीसीआय, हिंगणघाट.

टॅग्स :cottonकापूसGovernmentसरकार