शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

कार चोरट्याला नागपुरातून अटक

By admin | Updated: May 4, 2017 00:42 IST

सेलू येथून चोरी गेलेल्या कारचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेने प्राप्त माहितीवरून चोरट्यास नागपूर येथून अटक केली.

गुन्हे शाखेची कारवाई : चोरीतील कार जप्त वर्धा : सेलू येथून चोरी गेलेल्या कारचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेने प्राप्त माहितीवरून चोरट्यास नागपूर येथून अटक केली. त्याच्याकडून चोरीस गेलेली कार जप्त करण्यात आली. ही कारवाई बुधवारी करण्यात आली. ज्ञानेश्वर वामन गोहणे रा. हिंगणा, जि. नागपूर हे १९ एप्रिल रोजी त्यांच्या मित्राच्या कार क्र. एमएच ३१ सीएम ९३०० ने कान्होलीबारा येथून सेलू येथे परिवारासह लग्नाला आले होते. गाडी मंगल कार्यालयाच्या बाजूला लॉक करून कार्यालयात गेले. काही वेळाने कार्यालयाच्या बाहेर आले असता गाडी दिसली नाही. यामुळे त्यांनी सेलू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून सेलू पोलिसांसह गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. सेलू येथून चोरीस गेलेली कार सराईत गुन्हेगार विवेक डोफे, रा. जोगी नगर नागपूर याने चोरल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. सदर माहितीचा मागोवा घेत गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर येथे जाऊन विवेक डोफे यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याला विचारणा केली असता सदर कार त्यानेच चोरल्याची कबुली दिली. शिवाय कार राहत्या घराजवळ लपवून ठेवल्याचे सांगितले. यावरून चोरीस गेलेली कार किंमत ४ लाख ६ हजार रुपये जप्त करीत चोरट्यात अटक करण्यात आली. सदर आरोपी नागपूर येथील अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून तो सराईत गुन्हेगार आहे. अजनी पोलिसांनी त्याला तडीपार घोषित केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. निर्मलादेवी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक पराग पोटे, नरेंद्र डहाके, सचिन खैरकार, तुषार भुते, जगदीश डफ, मुकेश येल्ले यांनी पार पाडली.(कार्यालय प्रतिनिधी)