शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
4
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
5
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
6
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
7
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
8
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
9
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
10
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
11
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
12
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
13
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
14
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
15
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
16
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
17
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
18
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
19
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
20
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

हमीभावापेक्षा कमी दरात कापूस खरेदी

By admin | Updated: October 25, 2014 01:39 IST

कापूस खरेदीत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेकऱ्यांची लुट होत आहे. बाजार समितीत कापूस खरेदीला प्रारंभ झाला असून..

आर्वी : कापूस खरेदीत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेकऱ्यांची लुट होत आहे. बाजार समितीत कापूस खरेदीला प्रारंभ झाला असून पहिल्याच दिवशी १०० क्विंटलची आवाक झाली. यावेळी शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी म्हणजेचे ३ हजार ८०० रुपये दर देण्यात आला. शासनाने कापूस खरेदीचा हमी भाव ४ हजार ५० तर सोयाबीन ३ हजार ७५० रुपये जाहीर केला आहे; परंतु व्यापाऱ्यांनी आर्वीत पहिल्या दिवशी ३ हजार ८०० रुपये दराने १०० क्विंटल कापसाची खरेदी करून शेतकऱ्यांची आर्थिक लुट केली आहे़दरवर्षी शेतकऱ्यांचे कापूस व सोयाबीन खरेदी करण्याचे शासन दर ठरवून देते़ मात्र व्यापारी त्यांना कधी त्यापेक्षा कमी तर कधी त्यापेक्षा अधिक दर देत असतात. यंदा शेतकऱ्यांची परिस्थती हालाखीची असल्याने त्यांची व्यापाऱ्यांकडून लुट होत असल्याचे समोर येत आहे. शेतकऱ्यांनी कापूस बाजारात विकून दिवाळी साजरी करण्यासाठी कापूस व्यापाऱ्यांना विकला़ शेतकऱ्यांच्या या अडीचा लाभ घेत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची लूट करण्याचा सपाटाच सुरू केला आहे. आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने दिवाळीनंतर २७ आॅक्टोबर रोजी सोयाबीन खरेदी सुरू करण्यात येणार आहे़ शासकीय हमीभाव जाहीर केल्यावरही कमी भावाने कापूस खरेदी सुरू आहे़ यावर्षी सोयाबीन कपाशी पिकाची नापिकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना अपेक्षित पिकाची आराजी नसताना भावातही लुट होत असल्याने केंद्रशासनाने शेतकऱ्यांच्या या गंभीर विषयात तातडीने लक्ष घालून सी़सी़आय़ व महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाला हमीभावाने कापूस व नाफेडला सोयाबीन खरेदी करण्याचे तातडीने आदेश देऊन शेतकऱ्यांची आर्थिक लुट थांबविण्याची मागणी होत आहे़(तालुका प्रतिनिधी)