शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
2
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
3
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
4
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
5
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
6
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
7
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
8
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
9
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
10
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
11
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
12
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
13
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
14
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
15
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
16
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
17
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
18
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
19
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
20
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
Daily Top 2Weekly Top 5

मोहता जीनमध्ये आग १५० वर गाठी जळाल्या

By admin | Updated: December 25, 2015 02:46 IST

मोहता जिनिंगमध्ये आग लागल्याने अंदाजे १५० च्या वर कापूस गाठी जळाल्या. यात नुकसानाचा नेमका आकडा कळू शकला नाही.

शहरातील घटना : सीसीआयचा कापूस स्वाहा
वर्धा : मोहता जिनिंगमध्ये आग लागल्याने अंदाजे १५० च्या वर कापूस गाठी जळाल्या. यात नुकसानाचा नेमका आकडा कळू शकला नाही. नगर परिषद व उत्तम गलवा कंपनीच्या अग्निशमन दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठे नुकसान टळले. ही घटना गुरूवारी दुपारी १ च्या सुमारास घडली.
शहर पोलीस ठाण्याच्या समोर पणन महासंघाच्या कार्यालयाजवळ असलेल्या मोहता जिनिंग प्रेसिंगमध्ये सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र आहे. शिवाय व्यापारी व मोहता जिनिंगकडूनही कापूस खरेदी केली जाते. तिघांद्वारेही खरेदी केलेला कापूस मोहता जिनिंगमध्ये ठेवला जातो. याच जिनिंगमधील एका शेडमध्ये ठेवलेल्या सीसीआयच्या कापसाला गुरूवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. यात सुमारे १५० च्या कापूस गाठी जळून खाक झाल्या.
आग लागल्याचे निदर्शनास येताच नगर परिषद आणि उत्तम गलवा मेटॅलिक कंपनीच्या अग्निशमन दलास तसेच शहर पोलिसांना सूचना देण्यात आली. १.३० च्या सुमारास अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. काहीच वेळेत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले; पण कापसात धग कायम होती. दरम्यान, चांगला कापूस काढून घेण्याचे प्रयत्न करण्यात आले.
याबाबत सीसीआयचे देशमुख यांना विचारणा केली असता त्यांनी किती कापूस जळाला, किती नुकसान झाले, हे सांगण्यास असमर्थता दर्शविली. आगीचे कारणही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. शहर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करीत नोंद घेतली.(कार्यालय प्रतिनिधी)