मोकाटपणे फिरणाऱ्यांना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 05:00 AM2020-04-02T05:00:00+5:302020-04-02T05:00:02+5:30

पोलिसांनी सांगितले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाउन सुरू आहे. याला स्थानिक नागरिकांतून प्रतिसाद मिळत आहे. मात्र, काही हौशी मंडळी भाजीपाला आणि क्षुल्लक कारण पुढे करत दिवस-दिवस रस्त्यांवर मोकाटपणे वावरत असल्याचे पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आले. दरम्यान पोलिसांनी काही दिवस शिथिल धोरण अवलंबले. मात्र, अशा लोकांमध्ये कुठलाही फरक जाणवत नसल्याचे दिसून आले.

Bumping freely around | मोकाटपणे फिरणाऱ्यांना दणका

मोकाटपणे फिरणाऱ्यांना दणका

Next
ठळक मुद्दे२१ दुचाकी जप्त : आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई, घरातच बसण्याचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ‘लॉकडाउन’च्या काळात क्षुल्लक कारणाबरोबरच विनाकारण रस्त्यावर मोकाटपणे वावरणाºयांना पोलिसांनी चांगलाच दणका दिला असून जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत तब्बल २१ पेक्षा जास्त दुचाकी जप्त करण्यात आला आहे. मंगळवारपासून पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली असून त्यांना दंडही ठोठवण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाउन सुरू आहे. याला स्थानिक नागरिकांतून प्रतिसाद मिळत आहे. मात्र, काही हौशी मंडळी भाजीपाला आणि क्षुल्लक कारण पुढे करत दिवस-दिवस रस्त्यांवर मोकाटपणे वावरत असल्याचे पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आले. दरम्यान पोलिसांनी काही दिवस शिथिल धोरण अवलंबले. मात्र, अशा लोकांमध्ये कुठलाही फरक जाणवत नसल्याचे दिसून आले. मंगळवारपासून जिल्ह्यातील पोलिसांनी आपल्या कारवाईत कडकपणा आणला आहे. परिणामी, जिल्ह्यातील शहरांमधील वेगवेगळ्या रस्त्यांवर विनाकारण फिरणारी तब्बल २१ पेक्षा जास्त वाहने जप्त केली आहे. यामध्ये वर्धा पोलीस ठाण्यांतर्गत ११ दुचाकी, रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत ५, पुलगाव पोलीस ठाण्यांतर्गत १, समुद्रपूर पोलीस ठाण्यांतर्गत १ तर हिंगणघाट पोलीस ठाण्यांतर्गत ३ दुचाकी पोलीसांनी जप्त केल्या आहेत. त्यामुळे यापुढे रस्त्यावर विनाकारण फिरणाºयांवर वाहन जप्तीसह गुन्हे दाखल होणार आहे.

विनाकारण फिरणे पडणार महागात
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभर लॉकडाउन सुरू आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरातच थांबावे, मात्र, काही हौशी मंडळी क्षुल्लक कारणासाठी घराबाहेर पडून रस्त्यांवर गर्दी करीत असल्याचे आढळून आले आहे. यापुढे अशांच्या दुचाकी जप्त करीत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.

शहरात चार ठिकाणी नाकाबंदी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेने कारवाईला गती आणली असून शहरातील बजाज चौक, पावडे चौक, आर्वीनाका, शिवाजी चौकात नाकाबंदी करण्यात आली आहे. बुधवारी अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे यांनी शिवाजी चौकात विनाकारण फिरणाºयांच्या दुचाकी जप्त करीत त्यांच्यावर कारवाई केली. शहर, रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या कारवाईत २५ ते ३० दुचाकी जप्त करण्यात आल्या.

प्रारंभीचे काही दिवस प्रशासनाने याकडे शिथिलतेने पहिले. मात्र, विनाकारण फिरणाºयांमध्ये कुठलाही फरक पडला नाही. परिणामी, अशांच्या दुचाकी जप्त करून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई निरंतर सुरू राहील.
- नीलेश मोरे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा.

Web Title: Bumping freely around

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.