खैरी गावाचा तुटला संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 06:00 AM2019-09-28T06:00:00+5:302019-09-28T06:00:10+5:30

खैरी गावात ये-जा करण्यासाठी कमी उंचीचा पूल आहे. दर वर्षी पावसाळ्यात नदीला पाणी वाढल्यावर खैरीवासीयांच्या अडचीत भर पडते. पावसाळ्यात नदीला पाणी आल्यास या पुलावरून नेहमी पाणी असते अश्या स्थितीत गावकरी, विद्यार्थी आपला जीव मुठीत घेऊन पुराच्या पाण्यातून मार्ग काढतात.

Broken contact of Khairi village | खैरी गावाचा तुटला संपर्क

खैरी गावाचा तुटला संपर्क

googlenewsNext
ठळक मुद्देपुलावरून वाहते पुराचे पाणी : ग्रामस्थांच्या अडचणीत भर

लोकमत न्यूज नेटवर्क
आंजी (मोठी) : धाम नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने नजीकच्या खैरी गावात जाणाऱ्या पुलावरून सध्या पुराचे पाणी वाहत आहे. यामुळे या गावाचा काल रात्रीपासून इतर गावांशी संपर्क तुटला आहे. पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने शळकरी मुला-मुलींना घरीच रहावे लागले. खैरी गावाकडे जाणाºया पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी आहे.
खैरी गावात ये-जा करण्यासाठी कमी उंचीचा पूल आहे. दर वर्षी पावसाळ्यात नदीला पाणी वाढल्यावर खैरीवासीयांच्या अडचीत भर पडते. पावसाळ्यात नदीला पाणी आल्यास या पुलावरून नेहमी पाणी असते अश्या स्थितीत गावकरी, विद्यार्थी आपला जीव मुठीत घेऊन पुराच्या पाण्यातून मार्ग काढतात. नदीवरील पुलाची उंची वाढविण्यासाठी मागील २० वर्षांपासून संबंधित विभागाला वारंवार निवेदन देण्यात आली. परंतु, दुर्लक्ष करण्यात धन्यता मानली जात आहे. मागील निवडणुकीच्या वेळी तीव्र आंदोलनाचा पवित्रा येथील ग्रामस्थानी घेतला होता. त्याची दखल घेऊन वेळीच योग्य कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, अद्यापही समस्या कायम आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी आहे.

Web Title: Broken contact of Khairi village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.