मोफत धान्य वितरणाला ‘ब्रेक’; पुढील आदेशाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 05:00 AM2020-06-30T05:00:00+5:302020-06-30T05:00:15+5:30

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर लॉकडाऊन घोषित झाले. त्यानंतर संपूर्ण व्यवहार थांबल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागला. ही अडचण ओळखून शासनाकडून प्रधानमंत्री गरीब कल्यण योजनेंतर्गत मोफत तांदूळ पुरवठा करण्यात येत होता. तर त्यानंतर राज्य शासनाने अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना तांदूळ, गहू आणि उपलब्धतेनुसार डाळींचा पुरवठा सुरू केला होता.

‘Break’ to free grain distribution; Waiting for the next order | मोफत धान्य वितरणाला ‘ब्रेक’; पुढील आदेशाची प्रतीक्षा

मोफत धान्य वितरणाला ‘ब्रेक’; पुढील आदेशाची प्रतीक्षा

Next
ठळक मुद्देयोजनेचे तीन महिने पूर्ण : लॉकडाऊन काळात गरजू, गरीबांना शासनाकडून ९८ टक्के धान्यसाठ्याचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता समाजातील विविध घटकांना घरीच थांबावे लागले. कुणाचीही उपासमार होवू नये, त्यासाठी सर्व घटकांना धान्यसाठा वितरीत करण्यात येत होता. अंत्योदय, प्राधान्य कुटुंबासह केशरी कार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळत असल्याने काही प्रमाणात दिलासा होता. पण, आता योजनेची मुदत ३० जून रोजी संपणार असल्याने पुढील महिन्यात मोफत धान्य मिळणार की, नाही या संभ्रमात गरीब, गरजू नागरिक आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर लॉकडाऊन घोषित झाले. त्यानंतर संपूर्ण व्यवहार थांबल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागला. ही अडचण ओळखून शासनाकडून प्रधानमंत्री गरीब कल्यण योजनेंतर्गत मोफत तांदूळ पुरवठा करण्यात येत होता. तर त्यानंतर राज्य शासनाने अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना तांदूळ, गहू आणि उपलब्धतेनुसार डाळींचा पुरवठा सुरू केला होता. सध्या लॉकडाऊनमध्ये शिथीलता आली असून व्यवहार पूर्वपदावर येत असले तरी अडचणींचा डोंगर कायमच आहे. किमान पुढील महिना तरी मोफत धान्य वितरण सुरू ठेवण्याची मागणी गरजुंकडून होत आहे. जून महिना संपत आला तरी केंद्र सरकारकडून याबाबत कोणतेही आदेश आले नाही. एप्रिल, मे व जून तीन महिन्यांसाठी धान्य वितरणाचे नियोजन होते. आणि त्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी झाल्याचे पुरवठा अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. केंद्र सरकारकडून राज्य शासनाला काही निर्देश आल्यास धान्य वितरणाबाबत कार्यवाही होवू शकते. मात्र, अद्याप तरी प्रशासकीय पातळीवर निर्णयाची प्रतीक्षा आहे.

शासनाकडून योग्य निर्णय झाल्यास पुढील महिन्यात धान्य वाटप होणार आहे. शासनाच्या निर्णयाप्रमाणे ३० जूनपर्यंत मोफत धान्य वाटपाची मुदत आहे. त्यापुढे मोफत धान्य वाटपाचा कुठलाही आदेश मिळाला नाही. एप्रिल ते जून या तीन महिन्यांत ९८ टक्के धान्य वितरीत करण्यात आले आहे.
- रमेश बेंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी, वर्धा.

Web Title: ‘Break’ to free grain distribution; Waiting for the next order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.