शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

ब्राह्मण समाजाला आर्थिक स्तरावर सवलत मिळावी

By admin | Updated: August 4, 2014 23:54 IST

ब्राह्मण समाजाच्या भावी उदरभरणाकरिता व अस्तित्वासाठी आर्थिक स्तरावर सवलत देण्याची तरतुद करावी या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी वर्धा यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले.

वर्धा : ब्राह्मण समाजाच्या भावी उदरभरणाकरिता व अस्तित्वासाठी आर्थिक स्तरावर सवलत देण्याची तरतुद करावी या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी वर्धा यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले. यावेळी २५० ब्रह्मवृंदांनी स्वाक्षरी करून लेखी निवेदन उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांना दिले.ब्रह्मवृंद महासभेच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनानुसार, ब्राह्मण युवकांना व्यवसाय स्थापन करण्याकरिता आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, त्यांना व्यवसायाकरिता भांंडवलाची सोय पुरविणे, पुरोहित वर्गाला तुटपुंज्या आर्थिक मानधनावर उदरनिर्वाह करावा लागतो. यासंदर्भात त्यांना मासिक पाच हजार रुपये मानधन दिले जावे, ब्राह्मणांना जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूद करावी, जाणीवपूर्वक मानहानी आणि शिविगाळ यामुळे परिणामत: ब्राह्मण समाजात असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी ब्राह्मण समाजाचा समावेश अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्टमध्ये करुन समान नागरी कायदा स्थापन केला जावा, यासह आदी मागण्यांचा यात समावेश आहे. या समाजाला आरक्षण नसल्याने शैक्षणिक क्षेत्रात आर्थिक स्तरावर प्रवेश देऊन तितकीच प्रवेश फी निश्चित करावी. या मागण्यांचा तातडीने विचार करून तोडगा काढावा, असे निवेदन प्रा. जयंत मादुस्कर, विलास कुलकर्णी, ताराचंद चौबे, सतीश बावसे, हेमंत पाचखेडे, माधवी महाजन, वैभवी व्यास, रागिणी देवगांवकर, मंदार अभ्यंकर, श्याम पत्की, तुषार देवढे, विजय धाबे, प्रकाश परसोडकर व पुरोहित मंडळी, दिलीप दोडके यांच्या उपस्थितीत सादर केले.यानंतर शिष्टमंडळाने सुनील गाढे यांच्यासोबत चर्चा केली. शासनातर्फे केल्या जाणाऱ्या नियुक्तयाबाबत खुल्या प्रवर्गातील नेमणूकांसाठी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या नवीन निकालाची प्रत गाढे यांना देण्यात आली.(स्थानिक प्रतिनिधी)