बस-दुचाकीच्या अपघातात मुलगा ठार; वडील गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 06:00 AM2019-11-10T06:00:00+5:302019-11-10T06:00:25+5:30

तालुक्यातील बेलोरा शिवारात दुचाकी आणि एसटी बसची जोरदार धडक झाली. यात अंतोरा येथील रवींद्र मोहन कोदरकर (३६) याचा मृत्यू झाला. तर रवींद्रचे वडील मोहन कोदरकर गंभीर जखमी झाले. या घटनेची नोंद आष्टी पोलिसांनी घेतली आहे. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमीला तातडीने मोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तर रुग्णालयात नेत असतानाच वाटेत रवींद्रचा मृत्यू झाला.

Boy killed in bus accident Father serious | बस-दुचाकीच्या अपघातात मुलगा ठार; वडील गंभीर

बस-दुचाकीच्या अपघातात मुलगा ठार; वडील गंभीर

Next
ठळक मुद्देबेलोरा शिवारातील घटना। घटनास्थळी जमली होती बघ्यांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : तालुक्यातील बेलोरा शिवारात दुचाकी आणि एसटी बसची जोरदार धडक झाली. यात अंतोरा येथील रवींद्र मोहन कोदरकर (३६) याचा मृत्यू झाला. तर रवींद्रचे वडील मोहन कोदरकर गंभीर जखमी झाले. या घटनेची नोंद आष्टी पोलिसांनी घेतली आहे.
अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमीला तातडीने मोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तर रुग्णालयात नेत असतानाच वाटेत रवींद्रचा मृत्यू झाला. वडील मोहन कोदरकर हे गंभीर जखमी असून ग्रामीण रुग्णालय मोर्शी येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हिंगणघाट आगाराची एम. एच. ४० वाय ५८७८ क्रमांकाची हिंगणघाट-मोर्शी ही बस आष्टी येथून प्रवासी घेऊन मोर्शीकडे जात होती. बस बेलोरा शिवारात आली असता एम. एच. ३२ ए.सी. ४५१६ या दुचाकीला बसने समोरून धडक दिली. यात रवींद्र कोदरकर व मोहन कोदरकर हे दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने मोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती रवींद्रला मृत घोषित केले. तर गंभीर जखमी असलेल्या मोहन कोदरकर यांच्यावर उपचार सुरू आहेत.रवींद्र व त्याचे वडील मोहन हे किराणा साहित्य खरेदी करण्यासाठी दुचाकीने गेले होते. परतीच्या प्रवासादरम्यान हा अपघात झाला.

Web Title: Boy killed in bus accident Father serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात