शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा

By admin | Updated: September 21, 2014 23:54 IST

आघाडीचे सहा सदस्य गैरहजर असल्यामुळे अत्यंत चुरशीच्या झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत बहुमताचा २६ हा आकडा नसतानाही भाजपाने जिल्हा परिषदेवर

वर्धा : आघाडीचे सहा सदस्य गैरहजर असल्यामुळे अत्यंत चुरशीच्या झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत बहुमताचा २६ हा आकडा नसतानाही भाजपाने जिल्हा परिषदेवर झेंडा फडकाविला. हिंगणी गटाच्या सदस्य चित्रा रणनवरे अध्यक्ष तर सावंगी (मेघे) गटाचे सदस्य विलास कांबळे हे नवे उपाध्यक्ष म्हणून विजयी झाले. गैर काँग्रेसी पक्षाने जिल्हा परिषदेवर सत्ता हस्तगत केल्याची ही वर्धा जिल्ह्यातील तिसरी वेळ होय. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही निवडणूक झाल्याने पुढे काय चित्र राहील, याकडे लक्ष लागले आहे.आघाडीकडून अध्यक्षपदासाठी उषाकिरण थुटे, निर्मला दंडारे तर उपाध्यक्षपदाकरिता संजय कामनापुरे यांनी नामांकन दाखल केले होते. भाजपाकडून अध्यक्षपदाकरिता चित्रा रणनवरे, चेतना मानमोडे यांनी तर उपाध्यक्षाकरिता विलास कांबळे यांचे नामांकन होते. जि.प. सभागृहात सुरू असलेल्या गदारोळात कोण विजयी होणार, अशी उत्सुकता मतमोजणीपर्यंत कायम होती. अशात दंडारे व मानमोडे यांनी नामांकन परत घेतल्याने सरळ लढत झाली. हात उंचावून झालेल्या मतदानानंतर निवडणूक निर्णय अधिकारी संजय भागवत यांनी २५ विरूद्ध १९ अशा फरकाने अध्यक्षपदाच्या निवडणुकीत चित्रा रणनवरे आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत विलास कांबळे यांनी विजय संपादन केल्याची घोषणा करताच भाजप नेत्यांचे चेहरे फुलले. जिल्हा परिषद निवडणुकीची चाहुल लागताच भाजपात नव्याने दाखल झालेले माजी खासदार दत्ता मेघे सक्रीय झाले. त्यांनीच पडद्यामागून या निवडणुकीची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन सूत्रे हलविली. कोणत्याही परिस्थितीत सत्ता हस्तगत करायचीच असा निर्धारच त्यांनी केला होता, असे आता बोलले जात आहे. मागील १५ दिवसांपासून या दिशेने हालचालींना वेग आला होता. आघाडीतील काही सदस्य संपर्क क्षेत्राबाहेर गेल्याचे लक्षात येताच आघाडीचे नेते ना. रणजित कांबळे, आ. सुरेश देशमुख यांनीही हालचाली सुरू केल्या. अखेरच्या क्षणापर्यंत आपली राजकीय शक्ती पणाला लावून या दोन्ही नेत्यांनी खिंड लढविली. मात्र त्यांना गैरहजर राहिलेल्या सदस्यांमुळे सत्ता राखता आली नाही. लोकसभा निवडणूक भाजपाने जिंकली. त्यानंतर आता जिल्हा परिषदेवरही झेंडा फडकावू, अशा विचाराने भाजपचे नेतेमंडळी कामाला लागले होते. त्यानुसार पळवापळवीही झाली. अखेर या राजकीय घडोमोडीनंतर भाजपाने सत्ता हस्तगत करण्यात यश मिळविले. जिल्हा परिषद काँग्रेसकडून भाजपाने हिसकावली. या निवडणुकीचा विधानसभा निवडणुकीवर किती प्रभाव पडतो, याकडे लक्ष लागले आहे.(लोकमत चमू)