शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यावर भाजपाचे वर्चस्व, काँगे्रसला दोन जागा

By admin | Updated: February 24, 2017 02:13 IST

तालुक्यातील जि.प. च्या ७ गटासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांनी ४ जागांवर तर पंचायत

हिंगणघाट : तालुक्यातील जि.प. च्या ७ गटासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांनी ४ जागांवर तर पंचायत समितीच्या १४ गणांपैकी ७ जागांवर विजय मिळवीत वर्चस्व सिद्ध केले. जि.प. च्या दोन जागा काँगे्रसने तर एक जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसने मिळविली. पं.स. मध्ये काँगे्रसने तीन, राष्ट्रवादीने दोन, शिवसेना आणि स्वभापने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळविला. यापूर्वी पं.स.वर राष्ट्रवादीची सत्ता होती. या निवडणुकीत भाजपने आ. समीर कुणावार यांच्या नेतृत्वात लक्षणीय कामगिरी केली. विद्यमान पं.स. सभापती तसेच राष्ट्रवादीचे वाघोली गटाचे उमेदवार संजय तपासे यांना या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. भाजपचे शरद शहारे यांनी ३६४ मतांनी विजय मिळवीत त्यांच्या गडाला सुरूंग लावला. सावली गटात भाजपचे नितीन मडावी यांनी स्वभापचे मागील १५ वर्षांच्या वर्चस्वाला मोठा धक्का दिला. अल्लीपूर गटात कॉंग्रेसचे माजी जि.प. अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे यांच्या पत्नी विभा ढगे यांनी ६३२ मतांनी विजय मिळवीत आपली जागा कायम राखली. राष्ट्रवादीच्या पुष्पा सातोकर यांनी २८१६ मते घेतली. जिल्हा परिषदेचा कानगाव मतदार संघ राखण्यात राष्ट्रवादीला यश मिळाले. या गटातून राष्ट्रवादीचे धनराज तेलंग यांना ९० मतांनी निसटता विजय मिळविता आला. गटात अत्यंत चुरशीची लढत झाली. काँगे्रसचे प्रकाश वाघमारे २१४२ मते, भाजपचे श्याम शंभरकर २००५ व शिवसेनेचे राजू नांदरे १९९७ मते घेत त्यांना तुल्यबळ लढत दिली. वडनेर गट राखण्यात भाजपला यश आले. भाजपच्या ज्योत्स्ना सरोदे यांनी १७२५ या मोठ्या फरकाने विजय मिळविला. राष्ट्रवादीच्या विशाखा या २४३४ मते घेत दुसऱ्या स्थानावर राहिल्या. शेकापूर (बाई ) गटात भाजपचे ज्येष्ठ उमेदवार व जि.प. शिक्षण सभापती वसंत आंबटकर यांना मोठा हादरा बसला. ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची होती. या गटात काँगे्रसचे उमेदवार व पं.स. उपसभापती मिलिंद कोपुलवार यांनी २७२७ मते घेत ६९३ मतांनी विजय मिळविला. आंबटकर यांना २०३४ मते मिळाली. पोहणा गटात भाजपचे माधव चंदनखेडे यांनी निवडणूक कौशल्याची चुनूक पुन्हा दाखविली. पती-पत्नी मिळून त्यांचा हा चवथा विजय ठरला. या गटात त्यांना ३८३३ मते मिळाली. त्यांची लढत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत यांच्याशी असल्याने या गटाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. सुनील राऊत यांना २९४२ मते मिळाली. पं.स. निवडणुकीत कुटकी गणात भाजपचे संभाव्य सभापती पदाचे उमेदवार प्रफुल्ल बाडे केवळ एका मताने पराभूत झाले. या गणात काँगे्रसचे आशिष पोटरकर यांनी ९९९ मते घेत विजय मिळविला. पं.स. मध्ये भाजपला ७, काँगे्रस ३, राष्ट्रवादी २, शिवसेना व स्वभाप प्रत्येकी एक असे संख्याबळ मिळविता आले. पं.स.मध्ये भाजप प्रथमच मोठा पक्ष म्हणून उदयास आला; पण बहुमतासाठी त्यांना दुसऱ्या पक्षाची मदत घ्यावी लागणार आहे.(तालुका प्रतिनिधी)