शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

नेट बँकिंगद्वारे गंडा घालणारा बिहारी बाबू सायबर अखेर सेलच्या गळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 05:00 IST

वायगाव येथील बंडू हुडे यांना खोटी बतावणी करून नेट बँकिंगच्या माध्यमातून १४ लाख १७ हजार ९६४ रुपयांनी फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी देवळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तर सावंगी (मेघे) येथील वर्षा कंडमबेथ यांना क्रेडीट कार्डची लिमिट वाढवून देण्याची बतावणी करून १ लाख ६७ हजारांनी गंडा घालण्यात आला. या प्रकरणी सावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील दोघांना लावला चुना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नेट बँकिंगद्वारे नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बिहार राज्यातील रहिवासी असलेल्या आरोपीला हुडकून काढत त्यास अटक करण्यात वर्धा पोलिसांच्या सायबर सेलला यश आले आहे.हर्षत पशुपती सिंग (२७) रा. खगडिया राज्य बिहार असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.वायगाव येथील बंडू हुडे यांना खोटी बतावणी करून नेट बँकिंगच्या माध्यमातून १४ लाख १७ हजार ९६४ रुपयांनी फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी देवळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तर सावंगी (मेघे) येथील वर्षा कंडमबेथ यांना क्रेडीट कार्डची लिमिट वाढवून देण्याची बतावणी करून १ लाख ६७ हजारांनी गंडा घालण्यात आला. या प्रकरणी सावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास वर्धा सायबर सेलकडे आला असता सायबर सेलच्या चमूने आरोपीबाबतची तांत्रिक माहिती गोळा केली. त्यानंतर आरोपी बिहार राज्यातील असल्याचे पुढे येताच सायबर सेलची चमू बिहार येथे रवाना झाली. देवळी ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी हर्षत पशुपती सिंग (२७) रा. खगडिया यास बिहार राज्यातील खगडिया येथून अटक करण्यात आली. तर सावंगी (मेघे) पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी अशोक कुमार पुना रविदास रा. कोचरा, जिल्हा नालंदा, बिहार याला हुलासगंज, जि. जहानाबाद येथून ताब्यात घेतले. परंतु, या आरोपीची प्रकृती खराब असल्याने त्यास सीआरपीसी कलम ४१ (१)(ब) प्रमाणे सूचनापत्र देण्यात आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे यांच्या निर्देशावरून पोलीस उपनिरीक्षक मोहन धोंगडे, सहा. पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे, पोलीस उपनिरीक्षक गोपाल ढोले, सौरभ घरडे, नीलेश कट्टोजवार, अनुप कावळे, अंकित जीभे, अमरदीप वाढवे, आकाश कसर, प्रकाश खरडे आदींनी केली. 

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिस