शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

भुगावात ऑक्सिजन निर्मितीसाठी लागणार ‘चायना मेड’ यंत्रसामग्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 05:00 IST

या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पातून जिल्ह्यासाठी किती ऑक्सिजन मिळू शकतो. तसेच येथे उत्पादित होणाऱ्या लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा सध्याच्या आपातकालीन परिस्थितीत वर्धाशेजारील काही जिल्ह्यांना पुरवठा करण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून व्यवहार्यता तपासण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि राज्य शासनाच्या  चमूने उत्तम गलवा येथील ऑक्सिजन प्रकल्प गाठून प्रत्यक्ष पाहणी केली.

ठळक मुद्देसंपूर्ण युनिट उभे व्हायला लागेल किमान सात महिन्यांचा कालावधी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यासह राज्यावर ओढवलेल्या लिक्विड ऑक्सिजन तुटवड्यावर मात करण्यासाठी भुगाव येथील उत्तम गलवा कंपनीच्या शेजारी असलेल्या आयनाॅक्सच्या ऑक्सिजन प्रकल्पाला राज्य शासनाच्या बड्या अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. पण या ठिकाणी लिक्विड ऑक्सिजन निर्मितीसाठी लागणारी यंत्रसामग्री  चायना येथून आणावी लागणार आहे. तसेच लिक्विड ऑक्सिजन निर्मितीचे संपूर्ण युनिट तयार होण्यासाठी किमान सात महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.झपाट्याने वाढत असलेली कोविड बाधितांची संख्या तसेच त्यांना लागणाऱ्या प्राणवायुची गरज लक्षात घेता उत्तम गलवा येथील आयनॉक्स या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पातून जिल्ह्यासाठी किती ऑक्सिजन मिळू शकतो. तसेच येथे उत्पादित होणाऱ्या लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा सध्याच्या आपातकालीन परिस्थितीत वर्धाशेजारील काही जिल्ह्यांना पुरवठा करण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून व्यवहार्यता तपासण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि राज्य शासनाच्या  चमूने उत्तम गलवा येथील ऑक्सिजन प्रकल्प गाठून प्रत्यक्ष पाहणी केली. याप्रसंगी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, आयुष्यमान भारत योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, उत्तम गलवाचे बिरेंद्र, मुख्य कार्यकारी अधिकारी बिजॉय कुमार आदींची उपस्थिती होती. सध्या जिल्ह्यात सुमारे १५ हजार क्युबीक मीटर ऑक्सिजनची गरज आहे. भविष्यात ५ मेट्रिक टन किंवा त्यापेक्षा जास्त ऑक्सिजन लागल्यास एवढी मोठी गरज भागविण्यासाठी पूर्वतयारी म्हणून सद्यस्थितीत असलेल्या औद्योगिक प्रकल्पाला लागणाऱ्या ऑक्सिजन  प्रकल्पातून वैद्यकीय ऑक्सिजनची गरज भागवली जाऊ शकते का? याची तयारी राज्य शासन करीत आहे, पण लिक्विड ऑक्सिजनसाठी लागणारी यंत्रसामग्री ही चायना येथे मिळत असल्याने आणि ती आयात केल्यावरही संपूर्ण युनिट उभा व्हायला किमान सात महिन्यांचा कालावधी लागेल असे नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर उत्तम गलवा कंपनीतील एका बड्या अधिकाऱ्याने सांगितले. या अडथळ्यावर जिल्हा प्रशासन राज्य शासनाच्या मदतीने वेळीच कशी मात करते, याकडे वर्धा जिल्ह्यातील नागरिकांसह सर्वांचेच लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या