सावधान...‘फोन पे, गुगल पे’ वरून घातला जातोय गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 05:00 AM2020-06-25T05:00:00+5:302020-06-25T05:00:14+5:30

तुमच्या गुगल पे आणि फोन पे अ‍ॅपवर तुम्हाला काही पैसे बोनस मिळाल्याचा मेसेज करून बोनस अपडेट करायचा असल्याचे सांगण्यात येते. कस्टमर केअरकडून फोन येतो, आणि तुम्हाला बोनस म्हणून मिळालेली रक्कम आधी भरून त्यानंतरच तुम्हाला बोनसची रक्कम मिळेल, असे आमिष दिल्या जाते. आमिषाला बळी पडून नागरिक ऑनलाईन फॉर्मवर आपली संपूर्ण माहिती आणि बोनस ची मिळालेली रक्कम टाकतो. नागरिकांची संपूर्ण गोपनीय माहिती घेऊन सायबर भामटे त्यांच्या खात्यातून ती रक्कम काढून घेत त्यांची फसवणूक करतो.

Beware ... ‘Phone Pay, Google Pay’ is being used by Ganda | सावधान...‘फोन पे, गुगल पे’ वरून घातला जातोय गंडा

सावधान...‘फोन पे, गुगल पे’ वरून घातला जातोय गंडा

Next
ठळक मुद्देसहा व्यक्तींची फसवणूक : सायबर सेलकडे शेकडोवर तक्रारी दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ‘फोन पे, गुगल पे’वर बोनस मिळाल्याचा मेसेज पाठवून खात्यांची संपूर्ण गोपनीय माहिती घेऊन युपीआय ट्रान्झॅक्शनद्वारे सायबर भामट्यांकडून नागरिकांना गंडविण्याचे प्रकार सुरू आहे. मंगळवारी एकाच दिवशी सायबर भामट्यांनी सहा जणांना एकूण ६४ हजार रूपयांनी गंडविल्याची तक्रार सायबर सेलकडे प्राप्त झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी फोन पे, गुगल पेवर ‘बोनस’ मिळाल्याच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन सायबर सेलद्वारा करण्यात येत आहे.
लॉकडाऊन काळात ऑनलाईन गंडा घालण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक तक्रारी सायबर सेलकडे प्राप्त होत आहे. त्यामुळे कोणत्याही मेसेजला उत्तर न देता गोपनीय माहिती देऊ नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
सर्वसामान्य नागरिकांना विविध पद्धतीने ऑनलाईन गंडा घालण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. ओएलक्स, पेटीएम आणि आता फोन पे आणि गुगल पे अ‍ॅपवर बोनस मिळाल्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून गोपनीय माहिती घेऊन त्यांच्या अ‍ॅपवरुन युपीआय ट्रन्झॅक्शनद्वारा लाखो रुपये उकळण्याचे काम सुरु आहे.
गुगल पे आणि फोन पे अ‍ॅपवर बोनस मिळाल्याचा मेसेज पाठवून त्यांच्या खात्याची गोपनीय माहिती घेऊन तब्बल सहा व्यक्तींची फसवणूक केल्याच्या तक्रारी सायबर सेलकडे प्राप्त झाल्या.
सायबर भामट्यांनी सुमीत तिमांडे यांची ३ हजार ७००, इंद्रजित बच्छराज राम यांची ३० हजार, संजिवनी नामक महिलेची ५ हजार, दांडेकर नामक युवकाचे ५ हजार ६००, आशिष पेठे यांची ४ हजार २०० तर आकाश सुखदेवे यांची १५ हजार ६०० रुपयांनी फसवणूक केली.
विशेष म्हणजे यासर्वांना बोनस मिळाल्याचे सांगून त्यांच्या खात्याची माहिती घेऊन फसवणूक करण्यात येत आहे. सायबर भामटे विविध शक्कल लढवून नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करीत आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सावध राहण्याची गरज असून अशा भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन सायबर सेलकडून करण्यात येत आहे.

असा घातला जातो गंडा
तुमच्या गुगल पे आणि फोन पे अ‍ॅपवर तुम्हाला काही पैसे बोनस मिळाल्याचा मेसेज करून बोनस अपडेट करायचा असल्याचे सांगण्यात येते. कस्टमर केअरकडून फोन येतो, आणि तुम्हाला बोनस म्हणून मिळालेली रक्कम आधी भरून त्यानंतरच तुम्हाला बोनसची रक्कम मिळेल, असे आमिष दिल्या जाते. आमिषाला बळी पडून नागरिक ऑनलाईन फॉर्मवर आपली संपूर्ण माहिती आणि बोनस ची मिळालेली रक्कम टाकतो. नागरिकांची संपूर्ण गोपनीय माहिती घेऊन सायबर भामटे त्यांच्या खात्यातून ती रक्कम काढून घेत त्यांची फसवणूक करतो.

युपीआय ट्रान्झॅक्शन असल्याने पैसे मिळण्यास अडचणी
सायबर भामट्यांनी नवी शक्कल लढविली असून ते आता नागरिकांना गुगल पे आणि फोन पेअ‍ॅपवर बोनस रक्कम मिळाल्याचे सांगून त्यांना गंडा घालीत आहे. पण, नागरिक स्वत: युपीआयद्वारा पैसे पाठवित असल्याने बँक याला जबाबदार नसल्याने फसवणुकीत गेलेले पैसे परत मिळण्यासासाठी अडचणी निर्माण होत आहे.

सायबर सेलकडून पाठपुरावा सुरू
लॉकडाऊनकाळात मोठ्या प्रमाणात नागरिकांना सायबर भामट्यांनी गंडविल्याच्या तक्रारी सायबर सेलकडे प्राप्त झाल्या आहे. मंगळवारी सहा व्यक्तींची फसवणूक झाली असून त्यांचे पैसे परत मिळविण्यासाठी सायबर सेलने संबंधित बँकेशी पत्रव्यवहार केला आहे. नागरिकांचे पैसे परत आणण्यासाठी सायबर सेलचे दिनेश बोथकर, नीलेश कट्टोजवार, अक्षय राऊत हे पाठपुरावा करीत आहे.

Web Title: Beware ... ‘Phone Pay, Google Pay’ is being used by Ganda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.