शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

कालवा बुजल्याने शेतात पाणी पोहोचण्यास अडथळे

By admin | Updated: December 22, 2015 03:17 IST

उपविभागातील पोथरा धरणाचा डावा व उजवा कालवा ठिकठिकाणी बुजला आहे. कालव्यात धरणाचे पाणी दिसत असले तरी

पोथरा धरणाचे दोन्ही कालवे बुजले : पाणी असूनही सिंचनाची बोंब; शेतकऱ्यांचे नुकसान
भास्कर कलोडे ल्ल हिंगणघाट
उपविभागातील पोथरा धरणाचा डावा व उजवा कालवा ठिकठिकाणी बुजला आहे. कालव्यात धरणाचे पाणी दिसत असले तरी कमी विसर्गामुळे ते शेतकऱ्यांच्या शेतात पोहचत नाही. पर्यायाने गाव सीमेत धरणाचे पाणी पोहचून सुद्धा शेती सिंचनाला उपयोग होत नाही. वर्षानुवर्षांच्या या समस्येकडे शासनाने लक्ष देवून या कालव्यांची डागडुजी करून शेवटच्या टोकापर्यंत सिंचनाची व्यवस्था करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
समुद्रपूर तालुक्यातील पोथरा नदीवर १९७८ मध्ये निर्मित पोथरा धरणाचा नऊ कि़मी.चा डावा कालवा पवनगाव नंतर वरोरा तालुक्यात जातो. ३५ कि़मी. चा उजवा कालवा लाडकी पर्यंत व पुढे १० कि़मी.ची वितरिका चिचघाट पारडीपर्यंत गेली आहे. या कालव्याची हिंगणघाट समुद्रपूर तालुक्यातील सिंचन क्षमता कागदोपत्री ५ हजार २०० हेक्टर दर्शविण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र निम्म्या क्षेत्रातही ओलीत पूर्ण क्षमतेने होत नसल्याचे वास्तव आहे.
दोन्ही कालवे ठिकठिकाणी गाळाने बुजले असून त्यात झुडपे वाढली आहेत. अनेक ठिकाणी कालव्याला भेगा गेल्या आहे. पूल कलवर्ट खचले आहेत. हिच अवस्था वितरिकांची व पाटचऱ्यांची झाली आहे. दरवर्षी या कालवे व पाटसऱ्यांचे दुरूस्तीसाठी शासनाकडून लाखो रुपयांचा निधी दिला जातो. तो खर्च झाल्याचे कागदोपत्री दिसत आहे. या कालव्याची व पाटसऱ्यांची मिळालेल्या निधीच्या प्रमाणात दुरूस्ती होत नसल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी ५-१० वर्षांची बाभळीची ऐटीत वाढणारी झाडे दिसत आहेत.

कालव्याच्या दुरूस्तीकरिता ८.९३ कोेटींचा प्रस्ताव
४पोथरा धरणाचा डावा व उजवा कालवा दुरूस्तीसाठी या विभागाने ८ कोटी ९३ लाखाचे इस्टीमेट प्रस्तावित केले असून मंजुरीसाठी शासनस्तरावर प्रलंबित आहे. त्याच्या मंजुरीकडे लक्ष लागले आहे.

क्षमतेपेक्षा सिंचन अल्पच
४तालुक्यात पोथरा धरणाचे पाणी लाडकी बुरकोनीपर्यंत पोहचले आहे. असे असले तरी बुरकोनीत मोटारपंपाची सोय असलेल्या चार पाच शेतकऱ्यांनीच या पाण्याचा सिंचनासाठी लाभ घेतल्याचे म्हणणे आहे. बुरकोनीपर्यंत धरणाचे पाणी पोहचत असले तरी पूर्ण क्षमतेने पाण्याचा विसर्ग होत नाही. पूर्ण क्षमतेने विसर्ग झाल्यास मुख्य कालवा ओव्हर फ्लो होवून फुटण्याची भीती असल्याने पूर्ण क्षमतेने पाणी सोडल्या जात नसल्याची माहिती आहे. पर्यायाने कालव्यात पाणी दिसत असले तरी पाटचऱ्यामध्ये ते वाहत नाही, अशी अवस्था आहे.
४ही अवस्था बदलावी म्हणून शेतकऱ्यांनी अनेकदा निवेदने दिली असली तरी समस्या मात्र कायम आहे. पूल कलवर्टच्या लिकेजसाठी गाऊटींगची आवश्यकता दर्शवून केवळ प्लास्टरने दुरूस्ती करण्यात येत असल्याचे काहींचे म्हणणे आहे. एकंदरीत मुख्य कालवा व पाटचऱ्या दुरूस्तीचे काम योग्यप्रकारे करून शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचविण्यासाठी शासन कर्मचारी अधिकाऱ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नाची गरज शेतकरी व्यक्त करीत आहेत.

पोथरा उजवा मुख्य कालवा व पाटचऱ्या ठिकठिकाणी गाळाने बुजल्या असल्याने व झुडपी वाढल्याने पूल कलवर्टला भेगा पडल्याने पाण्याचा अपव्यय होतो. पूर्ण क्षमतेने पाण्याचा विसर्ग होत नाही. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे शेतात धरणाचे पाणी पोहचत नाही.
- शंकर पानवटकर, शाखा अभियंता, उपविभाग हिंगणघाट.