करवसुलीसाठी थकबाकीदारांच्या घरासमोर वाजणार बॅण्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 05:00 IST2020-02-10T05:00:00+5:302020-02-10T05:00:12+5:30

ग्रामपंचायत प्रशासनाने ही नवी शक्कल लढविली असून याचा थकबाकीदारांवर किती परिणाम होतो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहेत. ग्रामपंचायत सदस्य सचिन पारसडे यांनी ग्रामसभेत ही अभिनव संकल्पना मांडली. सदस्यांसह ग्रामस्थांनी या संकल्पनेला दुजोरा दिला. त्या अनुषंगाने संपूर्ण गावात दवंडी देत ही माहिती देण्यात आली.

Band to play in front of outstanding home for tax collection | करवसुलीसाठी थकबाकीदारांच्या घरासमोर वाजणार बॅण्ड

करवसुलीसाठी थकबाकीदारांच्या घरासमोर वाजणार बॅण्ड

ठळक मुद्देअल्लीपूर ग्रामपंचायत : ग्रामसभेत सर्वानुमते झाला निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
अल्लीपूर : नागरिकांकडे पाच हजार रुपयांपेक्षा अधिक प्रमाणात गृह, पाणीकर थकीत असेल तर त्यांच्या घरासमोर बॅण्ड वाजवून करवसुली करण्यात येणार आहे. स्थानिक ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत याविषयी सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.
ग्रामपंचायत प्रशासनाने ही नवी शक्कल लढविली असून याचा थकबाकीदारांवर किती परिणाम होतो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहेत. ग्रामपंचायत सदस्य सचिन पारसडे यांनी ग्रामसभेत ही अभिनव संकल्पना मांडली. सदस्यांसह ग्रामस्थांनी या संकल्पनेला दुजोरा दिला. त्या अनुषंगाने संपूर्ण गावात दवंडी देत ही माहिती देण्यात आली.

ग्रामपंचायतीचा हा अभिनव उपक्रम गावात चर्चेचा विषय ठरला आहे. गावातली विकासकामांना गती मिळावी याकरिता करवसुली होणे गरजेचे आहे. कित्येकांकडे तब्बल तीन ते चार वर्षांपासून कर थकीत आहे. त्यामुळे विकासाला खिळ बसली आहे. ग्रामस्थांना सोई-सुविधा देण्याच्या उद्देशाने निर्णय घेतला आहे.
- नितीन चंदनखेडे, सरपंच, अल्लीपूर.

Web Title: Band to play in front of outstanding home for tax collection

टॅग्स :bankबँक