शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
5
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
6
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
7
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
8
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
9
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
10
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
11
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
12
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
13
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
14
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
15
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
16
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
17
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
18
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
19
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
20
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
Daily Top 2Weekly Top 5

केळी, डाळींबाला फटका

By admin | Updated: May 12, 2017 00:50 IST

गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेले वादळाचे थैमान गुरुवारीही कायम होते.

तळेगाव व एकुर्लीला वादळाचा तडाखा : अनेक गावांतील बत्ती गुल लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा/तळेगाव (टालाटुले) : गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेले वादळाचे थैमान गुरुवारीही कायम होते. आर्वी मार्गावर मजरा व आंजी (मोठी) येथे झाडे तुटून रस्त्यावर पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. तर बुधवारी रात्री तळेगाव (टा.)^ व एकुर्ली परिसराला वादळाने चांगलेच झोडपले. या वादळासह गारपीट झाल्याने येथील केळी आणि डाळींब बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावेळी झालेले गारपीट झाडांवरील पोपटांकरिता कर्दनकाळ ठरले. गारांच्या माऱ्यामुळे अनेक पोपटांचा मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी पुलगाव, आकोली परिसरात पाऊस आला. आर्वी मार्गावर झाडे तुटल्याने वीज पुरवठा खंडीत झाला होता. हा पुरवठा केव्हा सुरळीत होईल, याचा कुठलाही नेम नसल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे. बुधवारी रात्री आलेल्या वादळामुळे तळेगाव व एकुर्ली येथे शेतकऱ्यांनी शेतात त्यांच्या जनावरांकरिता तयार केलेल्या गोठ्यांवरील टीनपत्रे उडून गेले. तर काही घरांवरील छताचे नुकसान झाले. यावेळी आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली. या वादळात विजेचे २० पोल जमीनदोस्त झाल्याने रात्रभर गावकऱ्यांना काळोखाचा सामना करावा लागला. वीज पुरवठा खंडीत झाल्याने गावातील पाणी पुरवठाही खोळंबला आहे. यामुळे गुरुवारी सकाळी गावकऱ्यांना पाण्याकरिता भटकावे लागले. शासकीय अधिकाऱ्यांनी गावात येत नुकसानीची पाहणी करावी अशी मागणी जोर धरत आहे. झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्यात यावे अशी मागणी जि.प. सदस्य विमल वरभे तसेच एकुर्लीचे सरपंच भास्कर वरभे व गावकऱ्यांनी केले आहे.