शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
3
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
4
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
5
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
6
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
7
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
8
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
9
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
10
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
13
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
14
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
15
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
16
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
17
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
18
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
19
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
20
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

केळी उत्पादकांना भावात 300 रुपयांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 05:00 IST

संपूर्ण महाराष्ट्रात एकेकाळी दर्जेदार केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या सेलू तालुक्यात दिवसेंदिवस केळीचे लागवड क्षेत्र घटत आहे. भावबाजीचा फटका व वाढता उत्पादन खर्च यामुळे पुढे केळीच्या लागवडीवर परिणाम होण्याची शक्यता कृषितज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. यंदा मार्च महिन्यात चारशे रुपये, एप्रिल महिन्यात चारशे पन्नास रुपये, मे व जून महिन्यात पाचशे, जुलैमध्ये सहाशे, ऑगस्ट तसेच सप्टेंबर महिन्यात सातशे तर ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात आठशे रुपये क्विंटल केळीला भाव होता.

ठळक मुद्देकेळीच्या बागा नामशेष होण्याची व्यक्त होतेय भीती : विदर्भाचा कॅलिफोर्निया आता झाला रिकामा

  प्रफुल्ल लुंगे    लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : केळी उत्पादनासाठी विदर्भाचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील केळी उत्पादकांच्या अडचणीत सध्या भावबाजीमुळे मोठी भर पडली आहे. सध्या केळीच्या दरात प्रतिक्विंटल ३०० रुपयांनी घसरण आल्याने या भागातील केळीच्या बागा भविष्यात नामशेष होण्याची भीती वर्तविली जात आहे. संपूर्ण महाराष्ट्रात एकेकाळी दर्जेदार केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या सेलू तालुक्यात दिवसेंदिवस केळीचे लागवड क्षेत्र घटत आहे. भावबाजीचा फटका व वाढता उत्पादन खर्च यामुळे पुढे केळीच्या लागवडीवर परिणाम होण्याची शक्यता कृषितज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. यंदा मार्च महिन्यात चारशे रुपये, एप्रिल महिन्यात चारशे पन्नास रुपये, मे व जून महिन्यात पाचशे, जुलैमध्ये सहाशे, ऑगस्ट तसेच सप्टेंबर महिन्यात सातशे तर ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात आठशे रुपये क्विंटल केळीला भाव होता. पण डिसेंबर महिन्यात तीनशे रुपयांनी भाव कमी होत केळीचे दर पाचशे रुपये प्रतिक्विंटलवर आले आहे. भावातील या घसरणीचा सध्या मोठा आर्थिक फटका केळी उत्पादकांना सोसावा लागत आहे. काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांचा केळीच्या बगीच्याची तोड झाली की पूर्ण घडाचे काट्यावर वजन केले जायचे. तर आता घड कापला की त्याच्या वेगवेगळ्या फण्या केल्या जातात व कॅरेटमध्ये केळी भरून बाजारात विक्रीसाठी पाठविली जाते. विविध प्रक्रिया केल्यानंतर ही केळी नागपूर, हिंगणघाट, उमरेड, बुटीबोरी, वर्धा आदी ठिकाणी पोहोचविली जाते. एकट्या सेलूत तीन रॅपनिंग सेंटर आहे. अशोक दंडारे, मनोज बोबडे व दीपक तडस या केळी बागायतदारांनी ते काही वर्षांपूर्वी सुरू केले आहे. 

उत्पादन खर्चच अधिककेळीचे पीक हे सरासरी १५ ते १८ महिन्यांचे असून एका एकरात सुमारे सतराशे झाडे बसतात. असे असले तरी लागवडीपासून पीक हाती येईपर्यंत या पिकाची योग्य निगा घ्यावी लागते. त्यानंतर हा शेतमाल बाजारपेठेत विकला जातो. पण सध्याच्या दराच्या तुलनेत उत्पादन खर्चच अधिक असल्याचे शेतकरी सांगतात.

मोजक्याच गावात बागा सेलू तालुक्यातील रेहकी, वडगाव, कोटंबा, खापरी, शिवणगाव, किन्ही, मोही, हिंगणी, सुकळी धानोली अशा मोजक्याच गावात सध्या केळीच्या बागा शिल्लक राहिल्या आहेत. लागवड क्षेत्र घटत असल्याने भविष्यात बागा नामशेष होतील की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

केळी पिकाची खूप काळजी घ्यावी लागते. शिवाय उत्पादन खर्चही बऱ्यापैकी लागतो. मात्र, भाव स्थिर राहात नाही. इतर पिकांच्या लागवडीसाठी हा पैसा हातात येतो. त्यामुळे अडचण जाणवत नाही. खूप फायदा नसला तरी समाधान आहे.-कमलाकर झाडे, केळी उत्पादक, रेहकी.  

केळीच्या पिकाचा सरासरी कालावधी दीड वर्षांचा आहे. भावबाजी चांगली मिळाली तर परवडते अथवा नाही. मात्र, शेतात गेल्यावर हिरवीकंच केळीची बाग पाहून वेगळा आनंद मिळतो.- श्यामसुंदर बोबडे, केळी उत्पादक, वडगाव (कला). 

केळीच्या बागा पूर्वीच्या तुलनेत कमी झाल्या आहेत. शेतकऱ्यांकडून घेतलेल्या मालाची वर्गवारी करून तो मला रॅपनिंग सेंटरमध्ये तयार करून आम्ही तो ठोक विक्रेत्याकडे पाठवितो.- मनोज बोबडे, रॅपनिंग सेंटर मालक, सेलू.  

टॅग्स :Farmerशेतकरी