शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
3
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
4
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
6
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
7
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
8
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
9
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
10
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
11
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
13
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
14
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
15
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
16
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
17
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
18
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
19
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
20
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांवर हल्ला; १२ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 06:00 IST

गावात फेरफटका मारला असता काही लोक जुगार खेळताना आढळून आले. त्यामुळे त्यांनी त्या जुगार खेळणाऱ्याला हटकल्याने जुगार खेळणाऱ्यांनी बाचाबाची केली. याचे रुपांतर मारहाणीत होऊन जुगार खेळणाऱ्यांनी काठी व गोट्यांनी हल्ला चढविला. यात मारोती सिडाम यांच्या डोक्याला जबर मार लागला. तसेच मनिष राठोडही जखमी झाला.

ठळक मुद्देसात दिवसांची पोलीस कोठडी : पोलीस इतर आरोपींच्या मागावर

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : तालुक्यातील वडगाव येथे पोळ्याच्या बंदोबस्ताकरिता गेलेल्या मनीष राठोड व मारोती सिडाम या दोन पोलीस शिपायांनी जुगार खेळणाऱ्यांना हटकले. त्यामुळे जुगाऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवून जखमी केले. याप्रकरणी पोलिसांनी १२ जणांना अटक केली असून त्यांना सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे.वडगाव या गावात शांततेत पोळा पार पडावा म्हणून जमादार मारोती सिडाम व शिपाई मनिष राठोड यांची ड्यूटी लावण्यात आली होती. त्यांनी गावात फेरफटका मारला असता काही लोक जुगार खेळताना आढळून आले. त्यामुळे त्यांनी त्या जुगार खेळणाऱ्याला हटकल्याने जुगार खेळणाऱ्यांनी बाचाबाची केली. याचे रुपांतर मारहाणीत होऊन जुगार खेळणाऱ्यांनी काठी व गोट्यांनी हल्ला चढविला. यात मारोती सिडाम यांच्या डोक्याला जबर मार लागला. तसेच मनिष राठोडही जखमी झाला.याप्रकरणी आरोपींनी दोन्ही शिपायांना लाथाबुक्क्यांनी मारहाण व शिविगाळ करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तसेच जीवघेणा हल्ला चढविला, अशी तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी अरूण श्रीराम काळे, प्रमोद उत्तमराव पांडे, पवन विजय पांडे, गणेश जानराव केवट, दिनेश नामदेव मेश्राम, रामेश्वर सुरेश मेश्राम, गजानन काशिनाथ मारबते, रामभाऊ गोविंद मारबते, सूरज अशोक केवट, विजय एकनाथ पांडे, सदाशिव केवट व राजेंद्र मारबते या बारा जणांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.या प्रकरणात आणखीही आरोपी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पुढील तपास ठाणेदार संपत चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गोपाल ढोले करीत आहेत.

टॅग्स :Policeपोलिस