सेलूच्या यशवंत चौकात युवकावर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 06:00 IST2020-01-20T06:00:00+5:302020-01-20T06:00:11+5:30

राहूल जगताप आणि त्याचा मित्र अंकीत उडान हे दोघे एम. एच. ४९ ए. बी. ६७८६ क्रमांकाच्या दुचाकीने घोरड येथून सेलू मार्गे सुकळी येथे जात होते. दरम्यान नशीब रमेश तायवाडे रा. जंगलापूर, वैभव बाबा वांदीले रा. कोटंबा या दोघांनी एम. एच. ३२ ए. बी. ८६०८ क्रमांकाच्या दुचाकीने मागाहून येत दुचाकी आडवी करीत राहूल जगताप याची वाट अडविली.

Attack with knife on a youth in Yashwant Chowk of Selu | सेलूच्या यशवंत चौकात युवकावर चाकूहल्ला

सेलूच्या यशवंत चौकात युवकावर चाकूहल्ला

ठळक मुद्देपोलिसांत गुन्हा दाखल : जखमीवर उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी युवकावर चाकूने वार करीत त्यास गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना सेलू येथील यशवंत चौकात घडली. राहूल जगताप (२४) रा. जंगलापूर, असे जखमीचे नाव आहे.
राहूल जगताप आणि त्याचा मित्र अंकीत उडान हे दोघे एम. एच. ४९ ए. बी. ६७८६ क्रमांकाच्या दुचाकीने घोरड येथून सेलू मार्गे सुकळी येथे जात होते. दरम्यान नशीब रमेश तायवाडे रा. जंगलापूर, वैभव बाबा वांदीले रा. कोटंबा या दोघांनी एम. एच. ३२ ए. बी. ८६०८ क्रमांकाच्या दुचाकीने मागाहून येत दुचाकी आडवी करीत राहूल जगताप याची वाट अडविली. दरम्यान नशीब तायवाडे याने जुन्या वादाच्या कारणावरून राहुलच्या छातीवर, पोटावर चाकूने वार करून त्यास गंभीर जखमी केले. तसेच आरोपींनी संगणमत करून राहूल व त्याच्या मित्र अंकीत उडान याला मारहाण केली. दोन्ही जखमींना तातडीने सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे राहूल याचे बयाण नोंदविण्यात आले. याच बयाणावरून आरोपींविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही आरोपींची मंगळवारपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी
सदर प्रकरणातील आरोपी नशीब रमेश तायवाडे रा. जंगलापूर आणि वैभव बाबा वांदीले रा. कोटंबा यांना सेलू पोलिसांनी अटक करून त्याची मंगळवार २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळविली आहे.

Web Title: Attack with knife on a youth in Yashwant Chowk of Selu