शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

आर्वीच्या विजयला धामणगावच्या दोघांनी संपविले, गळा आवळून केली हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 05:00 IST

मारडा शिवारातील कॅनलमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने सुरूवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. त्यानंतर सुरूवातीला पोलिसांनी मृतकाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न केले असता मृतक हा आर्वी येथील असल्याचे पुढे आले. त्यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयीत आरोपी म्हणून धामणगाव येथून किसन सुदाम मंडधवरे (४८) आणि रमेश उदयभान भोयर (४०) दोन्ही रा. धामणगाव (रेल्वे) जि. अमरावती यांना ताब्यात घेवून विचारपूस केली.

ठळक मुद्देपोलीस तपासात उलगडले सत्य : पोलिसांनी ठोकल्या दोघांना बेड्या

लाेकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी) : पुलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मारडा शिवारातील कॅनलमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. या मृतकाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश असले असून विजय बन्साेड रा. आर्वी असे मृतकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याची धामणगाव येथील दोघांनी गळा आवळून हत्या केल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे.मारडा शिवारातील कॅनलमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने सुरूवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. त्यानंतर सुरूवातीला पोलिसांनी मृतकाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न केले असता मृतक हा आर्वी येथील असल्याचे पुढे आले. त्यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयीत आरोपी म्हणून धामणगाव येथून किसन सुदाम मंडधवरे (४८) आणि रमेश उदयभान भोयर (४०) दोन्ही रा. धामणगाव (रेल्वे) जि. अमरावती यांना ताब्यात घेवून विचारपूस केली. सुरूवातीला उडवा उडवीचे उत्तरे देणाऱ्या आरोपींनी पोलिसी हिसका मिळताच गुन्ह्याची कबुली दिली. शिवाय आपणच त्याला दुचाकीवर बसवून मंगरूळ दस्तगीर मार्गे धनोडी (ब.) येथील धरणाजवळ नेले. शिवाय तेथे त्याला बळजबरी दारू पाजून त्याचा गळा आवळून त्याची हत्या केली. शिवाय पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह फेकल्याचे पोलिसांना सांगितले. आरोपींच्या या कबुलीवरून पोलिसांनी या प्रकरणी मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून किसन मंडधवरे व रमेश भोयर याला अटक केली आहे. सदर गुन्ह्याचे घटनास्थळ आर्वी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्याने हे प्रकरण आर्वी पोलिसांकडे वळते करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनात पुलगावचे ठाणेदार रवींद्र गायकवाड, खुशाल राठोड, चंद्रभान मेघरे, बाबुलाल पंधरे, महादेव सानप, रूपेश रघाटाटे, विनोद रघाटाटे, जयदीप जाधव, मुकेश वांदिले, अशोक रामटेके, मोसीम शेख यांनी केली.

 

टॅग्स :Murderखून