नवदाम्पत्यावर वधू कुटुंबीयांनी वर्धेतून टाकल्या अक्षता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 05:00 AM2020-05-25T05:00:00+5:302020-05-25T05:00:39+5:30

आता मुलीचे लग्न आपण कसे बघणार असा हा प्रश्न कायम होता. त्यानंतर याची माहीती वर्धेचे माजी न.प. उपाध्यक्ष कमल कुलधरिया यांना मिळाली. त्यांनी तातडीने त्यांच्या निवासस्थानी वधू कुटुंबीयांना विवाह सोहळा बघता यावा, यासाठी विशेष व्यवस्था केली. याच ठिकाणाहून रविवारी दिल्लीत पार पडलेला विवाह सोहळा वधू कुटुंबीयांनी वर्धेतून बघत नवदाम्पत्यावर अक्षता टाकून त्यांना पुढील आयुषासाठी आर्शीवाद दिले.

Akshata thrown by the bride's family in Wardha on the newlyweds | नवदाम्पत्यावर वधू कुटुंबीयांनी वर्धेतून टाकल्या अक्षता

नवदाम्पत्यावर वधू कुटुंबीयांनी वर्धेतून टाकल्या अक्षता

Next
ठळक मुद्देदिल्लीत पार पडला लग्नसोहळा : मुलीने विचारल्यानंतर कुटुंबीयांनीही दिली लग्नास परवानगी

चैतन्य जोशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मानवी जीवन पद्धतीत अनेक बदल होत आहेत. ऐरवी विवाह सोहळ्याला शेकडो निकटवर्तीय उपस्थित राहायचे. परंतु, ओढावलेल्या कोरोना संकटामुळे सध्या विवाह सोहळाही मोठ्या पद्धतीने करण्यावर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर वर्धा शहराशेजारील रोठा येथील मूळ रहिवासी असलेल्या एका मुलीचा विवाह दिल्लीत रविवार २४ मे रोजी पार पडला; पण लॉकडाऊनमुळे दिल्ली न गाठू शकणाऱ्या वधूच्या आई-वडिलांनी वर्धेतूनच ऑनलाईन पद्धतीने लग्नसोहळा बघून नवदाम्पत्यावर अक्षता टाकून त्यांना आशीर्वाद दिले.
वर्धा शहराशेजारील रोठा येथील गोविंद गोपाळ हे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहेत. त्यांना अर्धांगवायूच्या आजारने ग्रासले आहे. तर त्यांची पत्नी मंजूषा या शेती करून कुटुंबाचा गाढा ओढतात. शेतीच्या जोरावर या गोपाळ दाम्पत्याने त्यांचे अपत्य अश्विनी, नकुल, तेजस्वीनी आणि चांदणी या चौघांना उच्च शिक्षित केले. त्यानंतर अश्विनी हिला दिल्ली येथे एका खासगी कंपनीत नोकरी लागली. मुलगी लग्नाची झाल्याने तिच्या कुटुंबीयांना तिच्या लग्नाची चिंता सतावत होती. अशातच मुलीने तिचा जीवनसाथी शोधल्याचा निरोप तिने तिच्या आई-वडिलांना दिला. त्यावर कुटुंबीयांनीही होकार दर्शविला. फेब्रुवारी महिन्यात साखरपुड्याचा सोहळा पार पडला. शिवाय मार्च महिन्यात लग्नाची तारीख काढण्यात आली. लग्नाची २४ मार्च ही तारीख जवळ येत असतानाच देशात कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे वधू-वराचे हात पिवळे कसे करावे असा प्रश्न दोन्ही कुटुंबीयांना सतावू लागला. अश्विनीच्या कुटुंबाने आणि मनप्रितसिंहच्या कुटुंबांनी दोघांचीही समजूत काढली. त्यानंतर दिल्लीतच विवाह पार पाडण्याचे ठरले. आता मुलीचे लग्न आपण कसे बघणार असा हा प्रश्न कायम होता. त्यानंतर याची माहीती वर्धेचे माजी न.प. उपाध्यक्ष कमल कुलधरिया यांना मिळाली. त्यांनी तातडीने त्यांच्या निवासस्थानी वधू कुटुंबीयांना विवाह सोहळा बघता यावा, यासाठी विशेष व्यवस्था केली. याच ठिकाणाहून रविवारी दिल्लीत पार पडलेला विवाह सोहळा वधू कुटुंबीयांनी वर्धेतून बघत नवदाम्पत्यावर अक्षता टाकून त्यांना पुढील आयुषासाठी आर्शीवाद दिले.

सर्वच आले होते सजून
वधूची आई मंजूषा, वडिल गोविंद, मुलगा नकुल तसेच बहिण तेजस्वीनी आणि चांदणी यांच्यासह आजोबा चिंतामणी शेंडे हे विवाह सोहळा बघण्यासाठी माजी न.प. उपाध्यक्ष कमल कुलधरीया यांच्याघरी सजून आले होते. वधू कुटुंबीय ऑनलाईन विवाह बघण्यासाठी आल्याची खात्री झाल्यावर पुढील लग्न विधी पार पडला.

Web Title: Akshata thrown by the bride's family in Wardha on the newlyweds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न