शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

आग लागल्यानंतर आली पारेषण विभागाला जाग

By admin | Updated: May 3, 2017 00:43 IST

नाचणगाव मार्गावरील विद्युत पारेषण कंपनीच्या आवारात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे २४ एप्रिल रोजी आग लागली होती.

कचरा केला साफ : जेसीबीने काढले गवत पुलगाव : नाचणगाव मार्गावरील विद्युत पारेषण कंपनीच्या आवारात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे २४ एप्रिल रोजी आग लागली होती. विद्युत वितरणचे सहायक अभियंता जी.बी. नाईक यांच्या समयसुचकतेने यात हानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या बंबाद्वारे दोन ते तीन तासांत आग विझविली. या घटनेनंतर पारेषणला जाग आली असून गवत कापण्यासह कचरा साफ करण्याचे अभियान राबविण्यात येत आहे. पारेषण कंपनीच्या आवारात पावरग्रीडच्या आसपास पाच ते सात फूट दाट गवत वाढले आहे. या गवताने अचानक पेट घेतला होता. अशी घटना तिसऱ्यांदा याच परिसरात घडली आहे; पण परिसरातील गवत कापण्याचे सौजन्य पारेषण विभागाने दाखविले नाही. आग लागल्यानंतर गवत कापण्यासाठी पारेषण विभागाला जाग आल्याचे दिसून येते. विद्युत पारेषण कंपनीच्या परिसरात गवत वाढले आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने वाळलेल्या गवताला आग लागण्याचे प्रमाण अधिक असते. २४ एप्रिल रोजी असाच प्रकार घडला. वाळलेल्या गवताने पेट घेतला. आग लागल्यानंतर पारेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग आली. परिसरातील गवत कापून परिसर स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. जेसीबीच्या साह्याने गवत कापणीचे काम सुरू आहे. हे काम आधी झाले असते तर आग लागली नसती. घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होत असल्याचे यावरुन स्पष्ट होते. नियमित गवत काढले तर भविष्यात अशा घटना घडणार नाही. पारेषण कंपनीतील अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.(तालुका प्रतिनिधी)