शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

चार नव्या रेल्वे मार्गांसाठी २१.६ हेक्टर जमीन अधिग्रहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 05:00 IST

वर्धा-नागपूर तिसरा रेल्वे मार्ग, वर्धा-नागपूर चौथा रेल्वे मार्ग, वर्धा -बल्लारशाह तिसरा रेल्वे मार्ग तसेच वर्धा-नांदेड रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी रेल्वे विभागाची मंजूरी मिळाल्यानंतर प्रत्यक्षात जमीन अधिग्रहित करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली. जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया कासवगतीने होत असल्याची ओरड होत असतानाच लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर पुन्हा नव्या जोमाने जमीन अधिग्रहण करण्याची प्रक्रिया वर्धा जिल्हा प्रशासनाच्यावतीने सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे९३ व्यक्तींना मिळाला मोबदला : डिसेंबर अखेरपर्यंत होणार खरेदी प्रक्रिया

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर वाढलेला ताण तसेच नागरिकांची मागणी या गोष्टींना केंद्र स्थानी ठेऊन वर्धा-बल्लारशाह, वर्धा-नांदेड तसेच वर्धा-नागपूर तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गासाठी सध्या जमीन अधिग्रहित केली जात आहे. डिसेंबर अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस असून आतापर्यंत ९३ शेतकऱ्यांची एकूण २१.६ हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे.प्राप्त माहितीनुसार, वर्धा-नागपूर तिसरा रेल्वे मार्ग, वर्धा-नागपूर चौथा रेल्वे मार्ग, वर्धा -बल्लारशाह तिसरा रेल्वे मार्ग तसेच वर्धा-नांदेड रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी रेल्वे विभागाची मंजूरी मिळाल्यानंतर प्रत्यक्षात जमीन अधिग्रहित करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली. जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया कासवगतीने होत असल्याची ओरड होत असतानाच लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर पुन्हा नव्या जोमाने जमीन अधिग्रहण करण्याची प्रक्रिया वर्धा जिल्हा प्रशासनाच्यावतीने सुरू करण्यात आली आहे.वर्धा-बल्लारशाह तिसरा रेल्वे मार्ग वर्धा जिल्ह्यात सुमारे ४० किमीचा राहणार असून त्यासाठी आतापर्यंत ५० शेतकऱ्यांची १०.८१ हेक्टर जमीन संपादीत करण्यात आली आहे. तर वर्धा-नांदेड हा रेल्वे मार्ग वर्धा जिल्ह्यात ३३.४०० किमीचा राहणार असून त्यासाठी आतापर्यंत २३ शेतकऱ्यांची ७.८३ हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे.तसेच वर्धा-नागपूर या तिसऱ्या रेल्वे मार्गासाठी सात शेतकऱ्यांची १.६८ हेक्टर आणि वर्धा-नागपूर या चौथ्या रेल्वे मार्गासाठी १३ व्यक्तींची १.२८ हेक्टर जमीन संपादीत करण्यात आली आहे.मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्णया चारही नवीन रेल्वे मार्गांसाठी अधिग्रहित करावयाची असलेल्या सर्वच जमिनीचे मूल्यांकन करण्यात आले आहे. याच मूल्यांकनाच्या आधारावर अधिग्रहित केलेल्या जमिनीच्या मालकाला मोबदला दिल्या जात असल्याचे सांगण्यात आले.मार्च महिन्यात जमीन संपादनाच्या कामाला गती दिली जात होती; पण मार्च अखेरीस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्याने या कामाला बे्रक लागला. मात्र आता नव्या जोमाने या कामाला गती दिली जात आहे. डिसेंबर अखेरपर्यंत खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.- सुनील कोरडे, निवासी उपजिल्हाधिकारी, वर्धा.

टॅग्स :railwayरेल्वे