शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थाकासमोरील अतिक्रमण ठरतेय अपघातास कारणीभूत

By admin | Updated: November 1, 2014 23:12 IST

स्थानिक बसस्थानक परिसरात दुभाजकावरील अतिक्रमण अपघातास कारणीभूत ठरत आहे़ यात अनेक अपघात झाले असून काहींना प्राण गमवावे लागले. अतिक्रमण काढण्याकरिता परिवहन विभागाने

कारंजा (घा़) : स्थानिक बसस्थानक परिसरात दुभाजकावरील अतिक्रमण अपघातास कारणीभूत ठरत आहे़ यात अनेक अपघात झाले असून काहींना प्राण गमवावे लागले. अतिक्रमण काढण्याकरिता परिवहन विभागाने अनेकदा पोलीस यंत्रणेस कळविले; पण राजकीय दबावामुळे याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जाते़ याकडे लक्ष देत अतिक्रमण हटवावे, अशी मागणी होत आहे़ऐन बसस्थानकासमोर असलेल्या अतिक्रमनामुळे शाळकरी मुले, नागरिक येथील दुकानाचा आधार घेतात़ शिवाय या दुकानाच्या आडून उभ्या असलेल्यांना वा रस्ता ओलांडताना समोरून येणारे वाहन दिसत नाही़ यामुळे अनेकदा अपघात घडतात़ या अतिक्रमीत दुकानामुळे नागरिक येथे मोठ्या संख्येने उभे राहतात़ या ठिकाणी नागरिकांची गर्दी असल्याने काही दिवसांपूर्वी अपघात घडला़ हे अपघात नाहक नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचे अनेक प्रसंग आहेत़ शिवाय गर्दीमुळे बसेसही बसस्थानकात न जाता महामार्गावर उभ्या राहतात़ यामुळेही किरकोळ अपघात वाढत आहेत़ संबंधितांनी याकडे लक्ष देत सदर अतिक्रमण हटवावे, अशी मागणी होत आहे़ सकाळी ७ वाजताच्या सुमारास तसेच ११ व ५ वाजता परिसरातील ग्रामीण मुले-मुली बसस्थानकावर जाण्याची धावपळ करतात़ दुभाजकावरील दुकानांमुळे रस्ता ओलांडताना वाहने दिसत नाही़ यामुळे अपघात होतात़ मुलींच्या छेड काढण्याच्या प्रकारातही यामुळे वाढ होत आहे़ याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे़(शहर प्रतिनिधी)