शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिकेच्या अग्निशमन विभागास रिक्त पदांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 05:00 IST

वर्धा नगरपालिकेच्या अग्निशमन विभागात सध्या स्थितीत एकच अग्निशमन बंब कार्यरत आहे. पण तोही तब्बल १६ वर्ष जूना असल्याने एखादी अनुचित घटना घडल्यावर परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. काही नवीन अग्निशमन बंब खरेदी करण्याचे न.प. प्रशासनाच्या विचाराधीन असले तरी अद्यापही नवीन अग्निशमन बंब खरेदी करण्यात आलेला नसल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देसोळावर्षे जुन्या अग्निशमन बंबाच्या भरोशावर ओढला जातोय गाढा

  लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्याचे स्थळ अशी वर्धा शहराची ओळख. पण याच वर्धा शहरातील स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या वर्धा नगरपालिकेतील अग्निशमन विभागाला सध्या घरघर लागल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. न.प.च्या या विभागात मंजूर मनुष्यबळापैकी अतिशय अल्प मनुष्यबळ कार्यरत असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे.वर्धा नगरपालिकेच्या अग्निशमन विभागात सध्या स्थितीत एकच अग्निशमन बंब कार्यरत आहे. पण तोही तब्बल १६ वर्ष जूना असल्याने एखादी अनुचित घटना घडल्यावर परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. काही नवीन अग्निशमन बंब खरेदी करण्याचे न.प. प्रशासनाच्या विचाराधीन असले तरी अद्यापही नवीन अग्निशमन बंब खरेदी करण्यात आलेला नसल्याचे वास्तव आहे. नगरपालिकेच्या या विभागाला सक्षम करण्याची गरज असून त्यासाठी तेथील अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी वेळीच योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.

दहा महिन्यांत २५ घटना जानेवारी ते ऑक्टोबर २०२० अखेरपर्यंत वर्धा शहराच्या कार्यक्षेत्रात तब्बल २५ ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. याची नोंद वर्धा नगरपालिकेच्या अग्निशनम विभागाने घेतली आहे. पण पालिकेच्या या विभागात अतिशय अल्प मनुष्यबळ असल्याने कार्यरत अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येत आहे. 

एकच अग्निशमनबंब; पण तोही जूनाचवर्धा नगरपालिकेच्या अग्निशमन विभागात दोन अग्निशमन बंब होते. पण त्यापैकी एक अग्निशमन बंब तब्बल २२ वर्ष जूना असल्याने त्याचा वापर करणे बंद करण्यात आले आहे. तर जो अग्निशमन बंब सध्या वापरला जात आहे तो १६ वर्ष जुना असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे न.प.च्या अग्निशमन विभागाला नवीन अग्निशमन बंबाची प्रतीक्षा आहे. 

न.प.च्या अग्निशमन दलात कर्मचाऱ्यांचा अभाव वर्धा नगरपालिकेच्या अग्निशमन विभागात दोन अधिकारी, आठ फायरमन तर चार चालकांची मंजूर पद आहेत.  अधिकची माहिती जाणून घेतली असता वर्धा नगरपालिकेच्या अग्निशमन विभागात सध्या दोन अधिकारी, दोन फायरमन आणि दोन चालक कार्यरत असल्याचे सांगण्यात आले.

न.प.च्या अग्निशमन विभागात सध्या सहा फायरमन आणि दोन चालकांची पदे रिक्त आहेत. तर पालिकेचा अग्निशमन बंब सुमारे १६ वर्ष पूर्वीचा असल्याने नवीन अग्निशमन बंब खरेदी करण्याचे पालिका प्रशासनाच्या विचाराधीन आहे. लवकरच अग्निशमन बंब खरेदी केला जाईल.- रविंद्र जगताप, विभाग प्रमुख,                          अग्निशमन विभाग, न.प. वर्धा.

 

टॅग्स :Fire Brigadeअग्निशमन दल