शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

नदीला मुबलक पाणी, तरी ग्रामस्थ तहानलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 05:00 IST

वर्धा नदीतील नाचणगाव व पुलगाव या दोन्ही गावांना पाणीपुरवठा करण्याकरिता वर्धा नदीत विहीर बांधण्यात आली आहे. या विहिरीतून पंपहाऊस, जलशुद्धीकरण केंद्र, पाण्याची टाकी आणि त्यानंतर वितरण असा पाण्याचा प्रवास असतो. गावात सध्या टंचाईचा सामना करावाल लागत असल्याने सरपंच निलीमा राऊत, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण सावरकर, ग्रामपंचायत सदस्य मोहन नावाडे, अमर जनबंधू व शब्बीर पठाण यांनी पाणीपुरवठा योजनेची पाहणी केली.

ठळक मुद्देदेखभाल दुरुस्तीचा अभाव : ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या भेटीत धक्कादायक वास्तव उघड

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : लगतच्या नाचणगाव व गुंजखेडा या दोन्ही गावांना पाणीपुरवठा करण्याकरिता एकत्र पाणीपुरवठा योजना आहे. वर्धा नदीपात्रातून या गावांना पाणीपुरवठा होत आहे. दोन्ही गावांना पाणी टंचाईची झळ बसत असल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी या योजनेची पाहणी केली असता धक्कादायक वास्तव पुढे आले. नदीपात्रात मुबलक पाणी असतानाही तेथे गाळ साचलेला आहेत तसेच पुलगावच्या नाल्याचेही पाणी त्यात शिरत असल्याचे निदर्शनास आले.वर्धा नदीतील नाचणगाव व पुलगाव या दोन्ही गावांना पाणीपुरवठा करण्याकरिता वर्धा नदीत विहीर बांधण्यात आली आहे. या विहिरीतून पंपहाऊस, जलशुद्धीकरण केंद्र, पाण्याची टाकी आणि त्यानंतर वितरण असा पाण्याचा प्रवास असतो. गावात सध्या टंचाईचा सामना करावाल लागत असल्याने सरपंच निलीमा राऊत, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण सावरकर, ग्रामपंचायत सदस्य मोहन नावाडे, अमर जनबंधू व शब्बीर पठाण यांनी पाणीपुरवठा योजनेची पाहणी केली. नदीत पंपहाऊसला ज्या ठिकाणावरून पाणी येते तेथे वाळू उपस्यामुळे मोठमोठे खड्डे तयार झाल्याने गाळ साचला आहे. तसेच पुलगाव येथील नाल्याचे पाणी या नदीत येत असल्याने जलशुद्धीकरण होण्यास अडचण निर्माण होत आहे. परिणामी नदीला मुबलक पाणी असूनही गावरकऱ्यांच्या घश्याला कोरड पडलेली आहे. यासंदर्भात जि.प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता गोनाडे यांनी पाण्याच्या जलशुद्धीकरणाबाबत आवश्यक त्या उपाययोजना सुरू असल्याचे सांगितले.२० वर्षांपासून रेती बदलविलीच नाहीजलशुद्धीकरण केंद्रात तुरटी, ब्लिचिंग यासोबत रेतीची आवश्यकता असते. ही रेती वापरायच्या अगोदर संबंधित विभागामार्फत प्रामाणिक केल्या जाते. परंतु, गुंजखेडा येथील या जलशुद्धीकरण केंद्राची रेती गेल्या वीस वर्षांपासून बदलविलेली नाही. खराब झालेली रेती बाहेर काढल्याने रेतीसाठी कमी झाला आहे. याचा परिणाम जलशुद्धीकरणावर होतो. तरी त्वरीत नवीन प्रमाणित रेती जलशुद्धीकरण केंद्रावर उपलब्ध करणे गरजेचे आहे.जलशुद्धीकरण केंद्रावर असणाऱ्या समस्यांसंदर्भात जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता वाघ यांच्याशी चर्चा केली आहे. नागरिकांच्या पाण्याची समस्या त्वरीत निकाली लाढण्याची मागणी केली आहे.- प्रवीण साखरकर, जि.प.सदस्य, नाचनगाव

टॅग्स :Waterपाणीriverनदी