शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यालयी दांडी मारणारे ‘होम क्वारंटाईन’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 05:00 IST

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने तत्काळ उपाययोजना सुरू केल्या. जिल्ह्याच्या सीमा सील करून संचारबंदी लागू केली. यासोबतच शासकीय कार्यालयातील कामकाज प्रभावित होऊ नये म्हणून अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५ टक्के करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कार्यालयामध्ये आळीपाळीने ५ टक्के कर्मचारी उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

ठळक मुद्देस्थानिक कर्मचारी वाहताहेत भार : संचारबंदीचा आधार घेत चांगभलं

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक असतानाही या जागतिक आपत्तीकाळात ते संचारबंदीचा आधार घेऊन आपापल्या घरी स्वयंघोषित ‘होम क्वारंटाईन’ झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे शासनाच्या ५ टक्के उपस्थितीलाही ग्रहण लागले असून स्थानिक कर्मचाऱ्यांनाच कामाचा भार वाहावा लागत आहे. काही कार्यालयात विभाग प्रमुखांकडून अशा कर्मचाऱ्यांना पाठबळ मिळत असल्याने शासकीय कामकाजाचा बोजवारा उडाला आहे.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने तत्काळ उपाययोजना सुरू केल्या. जिल्ह्याच्या सीमा सील करून संचारबंदी लागू केली. यासोबतच शासकीय कार्यालयातील कामकाज प्रभावित होऊ नये म्हणून अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५ टक्के करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कार्यालयामध्ये आळीपाळीने ५ टक्के कर्मचारी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. मात्र, या संचारबंदीमुळे नागपूर, अमरावती, यवतमाळसह इतर जिल्ह्यातून आवागमन करणारे बरेच अधिकारी आणि कर्मचारी लॉकडाऊनपासून कार्यालयात फिरकलेच नाहीत. त्यामुळे या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे बंधन नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक असून शासनाकडून त्यांना घरभाडे भत्ताही दिला जातो. अधिकारी व कर्मचारी बोगस घरभाडेपावती जोडून त्याची उचलही करतात. मात्र, आता या संचारबंदीमुळे मुख्यालयी दांडी मारणाऱ्यांचा हा गैरप्रकार चव्हाट्यावर आला आहे. आतापर्यंत मुख्यालयी राहात असल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले. पण, आता सत्यता पुढे आली आहे. संचारबंदीच्या काळातही बहुतांश अधिकारी व कर्मचारी आपापल्या जिल्ह्यातच अडकून पडले आहेत. कार्यालयात विचारणा केल्यास लॉकडाऊन संपतपर्यंत तरी ‘ते’ येणार नाहीत, असे सांगितले जात आहे.विभाग प्रमुखांकडूनच कर्मचाऱ्यांची पाठराखणशासनाच्या आदेशानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागप्रमुखांना पत्र पाठवून मुख्यालयी राहण्यासोबतच आळीपाळीने ५ टक्के कर्मचारी उपस्थित ठेवण्याची जबाबदारी दिली आहे. पण, विभागप्रमुखच मुख्यालयी राहात नसल्याने अधिनस्थ अधिकारी व कर्मचारीही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आहेत. एका विभागप्रमुखाला विचारल्यास लॉकडाऊनमुळे कर्मचारी कार्यालयात येऊ शकत नाही. त्यामुळे लॉकडाऊन उघडल्यावर ते कार्यालयात येईल, असे सांगण्यात आले. यावरून विभागप्रमुखांकडूनच मुख्यालयी न राहणाऱ्यांना पाठबळ मिळत असल्याचे दिसून येत आहे.सीईओंच्या आदेशालाही बगलजि.प.त १६ विभाग असून यातील काही अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी न राहता नागपूर, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातून ये-जा करतात. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी सर्वांना मुख्यालयी राहण्याचे आदेश देत सर्व विभागप्रमुखांसह उपस्थित पाच टक्के कर्मचाऱ्यांना नियमित स्वाक्षरी करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, या विभागप्रमुखांकडूनच या आदेशाला बगल दिली जात असल्याचे दिसून येत आहे. अद्याप काही विभागप्रमुख नागपुरातून ये-जा करतात. तर काही लॉकडाऊनपासून स्वगृही असल्याने कामाचा पार बोजवारा उडाला आहे. काही विभागात मात्र, नियमित कामकाज सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे.शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना संचारबंदीच्या काळात ये-जा करण्याकरिता विभागप्रमुखांच्या पत्रावरून प्रवासपास देण्यात आली आहे. सर्वांना मुख्यालयी राहणे बंधनकारक असतानाही अधिकारी व कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहात नसेल किंवा मुख्यालयी उपस्थित नसेल तर अशांची सर्व विभागप्रमुखांकडून माहिती घेऊन कारवाई केली जाईल.- विवेक भिमनवार, जिल्हाधिकारी, वर्धा.शासकीय कामाकाज प्रभावित होऊ नये याकरिता सर्व विभागप्रमुखांना सूचना देऊन आळीपाळीने ५ टक्के कर्मचारी नियमित उपस्थित ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सर्वांना मुख्यालयी राहून स्वाक्षरी करण्याचेही आदेश काढले आहेत. यानंतरही मुख्यालयाला दांडी मारली जात असेल तर त्यांची माहिती घेऊन कारवाई केली जाईल.- डॉ. सचिन ओम्बासे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.,वर्धा.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसEmployeeकर्मचारी