संस्थाध्यक्षांकडून ९५ हजारांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 06:00 AM2020-02-06T06:00:00+5:302020-02-06T06:00:09+5:30

स्थानिक नंदोरी चौक परिसरात घडलेल्या या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहेत. शिवाय समाजातील सर्वच स्तरातून घटनेचा निषेध केल्या जात आहे. मातोश्री आशाताई कुणावार महाविद्यालयात पीडिता ही वनस्पती शास्त्राची तासिका तत्त्वावर प्राज्ञापक होती. घटनेच्या दिवशी ती नेहमी प्रमाणे महाविद्यालयात जात असताना ही घटना घडली. या घटनेची माहिती स्वप्नील भांडारवार यांनी या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमेश तुळसकर यांना दिली.

95 thousand donations from the President | संस्थाध्यक्षांकडून ९५ हजारांची मदत

संस्थाध्यक्षांकडून ९५ हजारांची मदत

Next
ठळक मुद्देपीडितेच्या कुटुंबाला दिलासा : थेट एटीएम कार्डच ठेवले होते रुग्णालयात

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : येथील जळीत प्रकरणातील जखमी प्राध्यापिकेवर नागपूर येथील महागड्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु, तेथील खर्च या कुटुंबाला झेपावणारा नसल्याचे लक्षात येताच संस्थाध्यक्ष पांडुरंग तुळसकर यांनी पीडितेच्या उपचारासाठी आर्थिक मदत दिली आहे. त्यामुळे पीडितेच्या कुटुंबीयांना थोडा का होईना पण दिलासा मिळाला आहे.
स्थानिक नंदोरी चौक परिसरात घडलेल्या या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहेत. शिवाय समाजातील सर्वच स्तरातून घटनेचा निषेध केल्या जात आहे. मातोश्री आशाताई कुणावार महाविद्यालयात पीडिता ही वनस्पती शास्त्राची तासिका तत्त्वावर प्राज्ञापक होती. घटनेच्या दिवशी ती नेहमी प्रमाणे महाविद्यालयात जात असताना ही घटना घडली. या घटनेची माहिती स्वप्नील भांडारवार यांनी या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमेश तुळसकर यांना दिली. त्यांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालय गाठले. त्यांच्या मागेच त्यांचे बंधु शल्यविशारद डॉ. निलेश तुळसकर सुद्धा रुग्णालयात पोहचले. त्यांनी जखमीची पाहणी केली. तिला सुजन येत असल्याचे पाहून अन्न नलिकेतुन श्वसनाचा त्रास होऊ शकतो, असे निदान केले. तातडीने नागपूरला पाठविण्याचा निर्णय घेतला. यावेळी पीडितेची मानसिक स्थिती पाहून उमेश तुळसकर मोठ्या रुग्णालयात उपचाराचे तिला अस्वासन देऊन रुग्णवाहिकेतून नागपूरला पाठविले. त्यावेळी पीडितेची आत्या व प्रा. अश्विनी चौधरी या दोघी तिच्या सोबत होत्या. त्यांच्या मागेच संस्थाध्यक्ष पांडुरंग तुळसकर, पीडितेचे आई-वडील, मुख्याद्यापक नितीश रोडे, शिक्षक सिडामे रुग्णालयात पोहचले. उपचार सुरू झाला; पण रुग्णालयात पैसे भरणे आवश्यक असल्याचे पाहून प्राचार्य तुळसकर यांनी तातडीने ४५ हजार रुपये भरले. शिवाय २५ हजार रुपये किंमतीचे औषध आणले. ते इतक्यावर थांबले नाही तर त्यांनी आपले एटीएम कार्ड शिक्षकांजवळ देऊन औषधोपचारासाठी यातून खर्च करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. पीडितेच्या वडिलांनी ही १५ हजार रुपये भरले. सायंकाळी ५ हजाराची औषध देऊन तिच्या वडिलांकडे १० हजार रोख ठेवल्याचे व परततांना त्यांनी आपले एटीएम कार्ड शिक्षकांजवळ देऊन यातून खर्च करण्याची सूचना केल्याचे प्राचार्य तुळसकर यांनी सांगितले. शासनाचा मदतनिधी बुधवारी सकाळी ११ वाजता दोन दिवसानंतर पोहचला. शासनाच्या तोंडी सूचना ऐकण्यास रुग्णालय प्रशासन तयार नव्हते. महाविद्यालय प्रशासन पीडितेच्या पाठीशी असल्याने तिच्या उपचारासाठी पैशाची उणीव भासली नाही. भविष्यात पीडितेला सहकार्य करण्याची भावना पांडुरंग तुळसकर यांनी व्यक्त केली आहे.

मनसेच्या जिल्हाप्रमुखांकडून पीडितेच्या कुटुंबीयांची विचारपूस
घटनेच्या दिवशी मनसेच्या शाखा प्रमुखाने पीडित युवतीस येथील शासकीय रुग्णालयात पोहोचविले. त्यानंतर बुधवारी सकाळी मनसेचे जिल्हा प्रमुख अतुल वांदीले यांनी नागपूर गाठून पीडितेच्या आई-वडिलांची भेट घेत पीडितेच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. शिवाय कुठलीही मदत लागल्यास आम्हाला कळवा आम्ही त्यासाठी पुरेपूर प्रयत्न करू असे आश्वासन दिले आहे.

Web Title: 95 thousand donations from the President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.