शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

90 बेडरिडन व्यक्तींना मिळाली व्हॅक्सिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 05:00 IST

बेडरिडन लाभार्थ्यांना घरपोच लस दिली जात आहे. या लाभार्थ्यांना कोविडमृत्यू रोखण्यासाठी प्रभावी असलेली कोव्हॅक्सिन ही लस दिली जात असल्याचे सांगण्यात आले. बेडरिडन लाभार्थ्यांनीही घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करीत स्वत: कोविडची लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विविध आजारांमुळे अंथरुणावर असलेल्या प्रत्येक व्यक्तीला घरपोच कोविडची लस देण्याचे धोरण शासनाने निश्चित केले आहे. याच धोरणासह शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून शनिवार, ७ ऑगस्टपासून जिल्ह्यात अंथरुणावर असलेल्या (बेडरिडन) लाभार्थ्यांना काेरोनाची प्रतिबंधात्मक लस देण्यास सुरुवात झाली आहे. ७, ९ व १० ऑगस्ट या तीन दिवशी जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून तब्बल ९० बेडरिडन लाभार्थ्यांना कोविडची प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यात आरोग्य विभागाने विशेष सर्वेक्षण राबवून एकूण २ हजार २०५ बेडरिडन लाभार्थी आहेत, याची माहिती गोळा केली. त्यानंतर आता प्रत्यक्षात लसीकरण केले जात आहे. 

बेडरिन लाभार्थ्यांना दिली जातेय कोव्हॅक्सिन- बेडरिडन लाभार्थ्यांना घरपोच लस दिली जात आहे. या लाभार्थ्यांना कोविडमृत्यू रोखण्यासाठी प्रभावी असलेली कोव्हॅक्सिन ही लस दिली जात असल्याचे सांगण्यात आले. बेडरिडन लाभार्थ्यांनीही घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करीत स्वत: कोविडची लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

असा दिला आहे लससाठा- जिल्ह्यात २८ प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या प्रत्येक प्राथमिक आरेाग्य केंद्राला बेडरिडन लाभार्थ्यांसाठी कोव्हॅक्सिन लसीचे ४० डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तर वर्धा व हिंगणघाट या मोठ्या शहरांसाठी लसीचे ३०० डोस तसेच पुलगाव आणि आर्वी या मध्यम लोकसंख्या असलेल्या शहरांसाठी लसीचे ४० डोस सुरुवातीला देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

शनिवार ७ ऑगस्टपासून जिल्ह्यात बेडरिडन लाभार्थ्यांना घरपोच कोविडची प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. या विशेष मोहिमेसाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांना लससाठा उपलब्ध करून देण्यात आला असून, जशी मागणी होईल तसा लससाठा उपलब्ध करून दिल्या जाईल. कुठलाही बेडरिडन लाभार्थी लसीपासून वंचित राहू नये, यासाठी आरेाग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. बेडरिडन लाभार्थ्यांनीही कोविडची लस घेऊन या विशेष मोहिमेला यशस्वी करावे.- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस