जिल्ह्यात ७२७.५३ मि.मी. सरासरी पर्जन्यमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 05:00 AM2020-07-10T05:00:00+5:302020-07-10T05:00:02+5:30

रोहिणी आणि मृगातील सरी बरसताच जिल्ह्यात शेतकऱ्यांनी लगबगीने पेरणी कामे आटोपली. मात्र, जून महिन्यात तब्बल २० ते २२ दिवस पावसाने दडी मारली. मागील काही वर्षांत पावसाचे वेळापत्रक पूर्णत: बदलले आहे. गतवर्षी जून महिन्यात पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्यानंतर जुलै महिन्यात पावसाने उसंत घेतली होती. यावेळीही तशीच काहीशी स्थिती दिसून येत आहे.

727.53 mm in the district. Average rainfall | जिल्ह्यात ७२७.५३ मि.मी. सरासरी पर्जन्यमान

जिल्ह्यात ७२७.५३ मि.मी. सरासरी पर्जन्यमान

googlenewsNext
ठळक मुद्देगतवर्षीच्या तुलनेत पाऊस बरा : शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात यंदा रोहिणी आणि मृग नक्षत्रात बऱ्यापैकी पर्जन्यमान राहिले. जिल्ह्यात आतापावेतो सरासरी एकूण १९९३.३० मि. मि. पाऊस झाला आहे.
रोहिणी आणि मृगातील सरी बरसताच जिल्ह्यात शेतकऱ्यांनी लगबगीने पेरणी कामे आटोपली. मात्र, जून महिन्यात तब्बल २० ते २२ दिवस पावसाने दडी मारली. मागील काही वर्षांत पावसाचे वेळापत्रक पूर्णत: बदलले आहे. गतवर्षी जून महिन्यात पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्यानंतर जुलै महिन्यात पावसाने उसंत घेतली होती. यावेळीही तशीच काहीशी स्थिती दिसून येत आहे. दरवर्षी जून महिन्यात सरासरी एकूण १३७१ मिलिमीटर इतके पर्जन्यमान असते. यंदा जून महिन्यात १२६५ मि. मि. इतका पाऊस झाला. जुलै महिन्यात एकूण सरासरी २५७३.०० मिलिमीटर इतका पाऊस पडतो. या महिन्यात आतापर्यंत संपूर्ण जिल्ह्यात ७२७.५३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. जून महिन्यात वर्धा तालुक्यात ११७.४० मिलिमीटर, सेलू १५३.४०, देवळी १८०.५७, हिंगणघाट १२५.४६, समुद्रपूर १२४.५६, आर्वी १७३.४५, आष्टी (शहीद) १६०.१५, कारंजा (घा.) २३०.७८, तर जुलै महिन्यात वर्धा तालुक्यात ८७.६०, सेलू ९३.००, देवळी १२०.८०, हिंगणघाट १२४.६२, समुद्रपूर ६०.३१, आर्वी ५३.०२, आष्टी १११.२६ आणि कारंजा तालुक्यात ७६.९२ इतका सरासरी पाऊस झाला. समाधानकारक पावसामुळे शेतकरी आनंदी आहे.

गतवर्षीपेक्षा यंदा चांगला पाऊस
गतवर्षी याच महिन्यापर्यंत सरासरी १३३६.९६ मि. मि. इतका पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस २०४. मि. मि. देवळी तालुक्यात झाला. तर सर्वांत कमी पाऊस वर्धा आणि आर्वी तालुक्यात झाला. यंदा कारंजा तालुक्यात सर्वात कमी पाऊस आहे.

सोमवारच्या पावसामुळे वाहिले नदी-नाले
जिल्ह्यात बुधवारी तब्बल दीड ते दोन तास मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहत असल्याचे चित्र आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागात पिकांसह शेतजमीन खरडून गेली. या पावसामुळे जलाशयांच्या साठ्यात भर पडली आहे.

Web Title: 727.53 mm in the district. Average rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस