शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
4
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
5
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
6
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
7
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
8
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
9
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
10
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
11
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
12
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
13
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
14
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
15
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
16
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
17
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
18
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
19
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
20
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

67,628 व्यक्तींची काेविड लसीकडे पाठ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 05:00 IST

शंभर टक्के कोविड लसीकरण करणाऱ्या ग्रामपंचायतींना जिल्हा प्रशासनाकडून रोख पुरस्कार देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. परंतु, जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वर्धा शहराशेजारीलच नऊ ग्रामपंचायती लसीकरणाबाबत उदासीन असल्याचे ‘लोकमत’च्या हाती लागलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोविडच्या तिसऱ्या लाटेला ब्रेक लावण्यासह कोविड मृत्यू रोखण्यासाठी लस ही उपयुक्तच आहे. असे असले तरी जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वर्धा शहराशेजारील नऊ ग्रामपंचायत क्षेत्रांतील तब्बल ६७ हजार ६२८ व्यक्तींनी अजूनही कोविडची लस घेतली नसल्याचे वास्तव पुढे आले आहे.शंभर टक्के कोविड लसीकरण करणाऱ्या ग्रामपंचायतींना जिल्हा प्रशासनाकडून रोख पुरस्कार देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. परंतु, जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वर्धा शहराशेजारीलच नऊ ग्रामपंचायती लसीकरणाबाबत उदासीन असल्याचे ‘लोकमत’च्या हाती लागलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. सावंगी (मेघे), बोरगाव (मेघे), उमरी (मेघे), सिंदी (मेघे), सेवाग्राम, वरुड, म्हसाळा, पिपरी (मेघे), पवनार या ग्रामपंचायती वर्धा शहराशेजारी असून, या नऊ ग्रामपंचायतीमधील एकूण ९३ हजार २७८ व्यक्तींना कोविडची प्रतिबंधात्मक लस देण्याचे जिल्हा प्रशासनाकडून निश्चित करण्यात आले आहे. मात्र, १६ जानेवारीपासून जिल्ह्यात कोविड लसीकरण मोहीम सुरू होऊन आतापर्यंत केवळ २५ हजार ६४९ व्यक्तींनी कोविड लसीचा पहिला डोस घेतला आहे; तर १० हजार ७६४ लाभार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतले आहे. कोविड संकट काळात लस हिच सध्यातरी प्रभावी खबरदारीचा उपाय असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. 

पवनार अन् सेवाग्रामला ऐतिहासिक वारसा- सेवाग्राम येथून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य चळवळीला दिशा दिली; तर आचार्य विनोबा भावे यांनी पवनार येथून भूदान चळवळीला दिशा दिल्याने सेवाग्राम आणि पवनार या गावांना ऐतिहासिक वारसा आहे. परंतु, कोविड संकटकाळात फायद्याची ठरणाऱ्या कोविड लसीकरण मोहिमेबाबत या दोन्ही ग्रामपंचायती पाहिजे तसा पुढाकार घेताना दिसत नाहीत.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या