शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

६० फूट खोल विहिरीत आंदोलन

By admin | Updated: December 23, 2015 02:41 IST

२० वर्षांपूर्वी अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण न करता निम्न वर्धा प्रकल्प विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने आर्वी येथील नेरी पुनर्वसनचे प्रशांत पांडुरंग क्षीरसागर ...

प्रहारने वेधले लक्ष : अधिग्रहित जमिनीच्या मोबदल्याची मागणी
आर्वी : २० वर्षांपूर्वी अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण न करता निम्न वर्धा प्रकल्प विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने आर्वी येथील नेरी पुनर्वसनचे प्रशांत पांडुरंग क्षीरसागर यांच्या शेतातील जवळपास अर्धा एकर जमीन हस्तगत केली. याला २० वर्षांचा कालावधी लोटूनही अधिग्रहीत केलेल्या जमिनीचा मोबदला त्यांना अद्यापही मिळालेला नाही. या संदर्भात क्षीरसागर यांनी अनेकवेळा निवेदने दिली. त्याचा काहीही परिणाम झाला नसल्याने प्रहारच्यावतीने मंगळवारी शेतातील ६० फुट खोल विहिरीतच आंदोलन सुरू केले.
नेरी पुनर्वसनाला पाणीपुरवठा करण्याकरिता विदर्भ विकास महामंडळ निम्न वर्धा प्रकल्प, वर्धा यांनी सुमारे २० वर्षांपूर्वी प्रशांत क्षीरसागर यांच्या शेतातील अर्धा एकर जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण न करता हस्तगत केली. हस्तगत केलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा म्हणून प्रशांत क्षीरसागर गत २० वर्षांपासून लढा देत आहेत. त्यांनी अनेक वेळा मोबदला मिळण्याविषयी निवेदनही दिले; मात्र त्यांच्या पदरी निराशाच आली.
त्यांनी या प्रकरणाची माहिती प्रहार संघटनेला दिली. त्यांच्याकडूनही प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात आला; मात्र त्याचा काहीच लाभ झाला नाही. त्यामुळे पीडित शेतकऱ्याच्या शेतातील ६० फूट खोल विहिरीत उतरून तिथेच प्रशांत क्षीरसागर व बाळा जगताप यांनी आंदोलन सुरू केले. या आंदोलनाने खळबळ उडाली. तहसीलदारांनी आंदोलन स्थळ गाठत चर्चा करण्याचा प्रयत्न केला; मात्र ठोस आश्वासनाशिवाय बाहेर येणार नसल्याची भूमिका जगताप यांनी घेतली. तहसीलदारांनी या प्रकरणाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याने प्रकरण निवळले.(तालुका प्रतिनिधी)

चर्चेच्या आश्वासनावर आंदोलनाची सांगता
प्रहारच्या या आंदोलनाची दखल घेत तहसीलदार चव्हाण यांनी उपविभागीय अभियंत्याशी संपर्क साधला असता मी काही कामानिमित्त वर्धेला असून आता येऊ शकत नाही असे कळविले. यामुळे चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क केला. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून येत्या सोमवारी तातडीची बैठक घेत या विषयावर चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलनाची सांगता झाली.