शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

आणेवारी ५० पैशांवर; शेतकऱ्यांची थट्टा

By admin | Updated: November 22, 2014 23:07 IST

तालुक्यातील ६० पैकी खैरी धरणालगतची १२ ते १५ गावे वगळता ४५ गावांत सोयाबीनची आणेवारी ३० ते ४० टक्के एवढी कमी आहे; पण महसूल यंत्रणेने तालुक्याची आणेवारी ५० पैशांवर दाखविली़ झोपेत

कपाशी करपली : सोयाबीनचा उतारा एक एक पोतेकारंजा (घा़) : तालुक्यातील ६० पैकी खैरी धरणालगतची १२ ते १५ गावे वगळता ४५ गावांत सोयाबीनची आणेवारी ३० ते ४० टक्के एवढी कमी आहे; पण महसूल यंत्रणेने तालुक्याची आणेवारी ५० पैशांवर दाखविली़ झोपेत वा नशेत तर हा अहवाल तयार केला नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ ही आणेवारी शेतकऱ्यांची थट्टा करणारीच असल्याचे दिसते़तालुक्यात ६० गावे असून पेरणीयोग्य ४२ हजार ५०० हेक्टर जमीन आहे़ यात २४ हजार ५०० हेक्टरमध्ये सोयाबीन, ११ हजार ५०० हेक्टरमध्ये कापूस व उर्वरित जमिनीत मुंग, उडीद व अन्य पिके आहे़ पाऊस ७३० मिली झाला़ पावसाला विलंब झाल्याने सोयाबीनची पेरणीही उशीरा झाली़ बियाण्यांची उगवण क्षमताही कमी होती़ पेरणीनंतर पावसाने खंड दिला़ नंतर सतत पाऊस आला़ सोयाबीन ऐन फुलावर असताना तांबेरा रोग आला़ सततचा पाऊस व तांबेरा यामुळे सोयाबीन बुडाले़ काही शेतकऱ्यांनी तर वाढलेल्या मजुरीमुळे सोयाबीनची कापणीही केली नाही़ हेक्टरी तीन पोते सोयाबीनचा उतारा आला़ कपाशी, ज्वारी व तुरीची अवस्थाही जवळपास अशीच आहे़ कपाशीवर चुरडा पडला, ज्वारीवर तांबेरा तर तुरीवर अळ्यांचे आक्रमण झाल्याने पाने गळून पडत आहे़ कपाशीची बोंडे व पात्या कोमेजून खाली गळत आहे़ एकरी २ क्विंटल कापूस होईल की नाही, हे सांगणे कठिण आहे़ वीज पुरवठा पुरेसा नाही़ तालुक्यात सिंचनाच्या सुविधा तोकड्या आहे़ विहिरीची पातळी खोल गेली़ नाले कोरडे होत आहे़ खैरी धरण असूनही मोजक्या १० ते १२ गावांना सिंचनाची सोय होते़ एकही बारमाही वाहणारी नदी नाही़ यामुळे तालुक्यातील दुष्काळाचे सावट गडद होताना दिसतात़