शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

कवडीमोल भावामुळे ४० टक्के संत्रा झाडाला; शेतकऱ्यांची वाढली अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 05:00 IST

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसानंतर जिल्ह्यात ढगाळी वातावरण कायम राहल्याने यंदा संत्रा पिकाला चांगलाच फटका बसला. बदलत्या वातावरणामुळे फळगळ झाली. मागील तीन वर्षांच्या तुलनेत यंदा संत्रा उत्पादनात घट आली असून समाधानकारक भाव मिळेल अशी आशा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना होती. परंतु, शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेत येताच भाव गडगडल्याने संत्रा उत्पादकांसह छोट्या व्यापाऱ्यांना सध्या आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.

ठळक मुद्दे१० ते १५ रूपये प्रती किलो दर

  पुरूषोत्तम नागपुरे    लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : देश-विदेशात वेगळी ओखळ निर्माण करणारी नागपूरची संत्रा यंदा कवडीमोल भावात विकली जात आहे. परप्रांतीय बाजारपेठत केवळ १० ते १५ रुपये प्रती किलो भाव सध्या संत्राला मिळत असल्याने परिसरात ४० टक्के संत्रा झाडालाच असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. भाव गडगडल्याचा आर्थिक फटका छोट्या व्यापाऱ्यांसह आर्वी भागातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे.ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसानंतर जिल्ह्यात ढगाळी वातावरण कायम राहल्याने यंदा संत्रा पिकाला चांगलाच फटका बसला. बदलत्या वातावरणामुळे फळगळ झाली. मागील तीन वर्षांच्या तुलनेत यंदा संत्रा उत्पादनात घट आली असून समाधानकारक भाव मिळेल अशी आशा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना होती. परंतु, शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेत येताच भाव गडगडल्याने संत्रा उत्पादकांसह छोट्या व्यापाऱ्यांना सध्या आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. यंदाच्या वर्षी सुरूवातीला सततच्या पावसामुळे सोसाबीन तर नंतर गुलाबी बोंड अळीमुळे कपाशी पीक हातचे गेले. अशातच संत्रा पीक आधार देईल अशी आशा असताना भाव गडगडल्याने फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. 

तालुक्यात ७०० हेक्टरवर संत्राआर्वी तालुक्यातील सुमारे १ हजार २५० शेतकऱ्यांनी  ७०० हेक्टरवर संत्रा पिकाची लागवड केली आहे. यापैकी ५० टक्के शेतकऱ्यांनी यंदाच्या वर्षी संत्राची लागवड केली आहे. पण भाव गडगडल्याने ४० टक्के संत्रा सध्या झाडावरच आहे.

ढगाळी वातावरणामुळे संत्रा पिकाला चांगलाच फटका बसला आहे. इतकेच नव्हे तर सध्या संत्राचे भाव पडल्याने आमच्या अडचणीत भर पडली आहे. या भागातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या संत्र्याला योग्य भाव देत त्याची खरेदी करून हवालदिल शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.- राजू कदम,संत्रा उत्पादक, देऊरवाडा.

टॅग्स :agricultureशेती