शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

दुरूस्तीचे " ३.५० कोटी पडून

By admin | Updated: May 18, 2014 23:47 IST

राज्यमार्ग क्रमांक २४४ वरील तळेगाव-आष्टी-साहूर रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे प्रवाशांच्या जीवावर उठले आहेत. या रस्त्याच्या दुरूस्तीकरिता बांधकाम

 राज्यमार्ग खड्ड्यात: कामाचा शुभारंभ नाही

आष्टी(शहीद) : राज्यमार्ग क्रमांक २४४ वरील तळेगाव-आष्टी-साहूर रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे प्रवाशांच्या जीवावर उठले आहेत. या रस्त्याच्या दुरूस्तीकरिता बांधकाम विभागाकडून साडेतीन कोटी रुपये मंजूर करण्यात आले, ते येथील बांधकाम विभागाला मिळालेही. असे असले तरी या राज्यमार्गाच्या दुरूस्तीच्या कामाला अद्यापही सुरुवात झाली नाही. अशात पावसाळा काही दिवसांवर आला आहे. या पावसाच्या दिवसात रस्त्याचे काम कसे होणार असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे. तळेगाव ते आष्टी हा १२ किमी तर आष्टी ते साहूर हा रस्ता १७ किमीचा आहे. या रस्त्यावरून दिवसरात्र जड वाहतूक सुरू आहे. क्षमतेपेक्षा अधिक वजनाचे वाहन रस्त्यावरून धावत असल्याने येथे मोठमोठे खड्डे पडले. या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्यावर वाहन चालवितांना खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही. रात्रीच्या वेळी दुचाकी चालक खड्ड्यांमध्ये जावून अनेकवेळा अपघात झाले आहेत. यात गत पाच वर्षांत ३०५ लोकांना जीव गमवावा लागला. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुरूस्तीसाठी यापूर्वी कोट्यवधी रुपये खर्च केले; मात्र या मार्गाने जड वाहतूक असल्याने केलेली डागडुजी लगेच उखडून खड्डे उघडे पडतात. सन २०१३-१४ मध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे रस्त्याचे नुकसान झाले. त्याची डागडुजी व नुतनीकरण करण्यासाठी साडेतीन कोटी रुपये प्राप्त झाले. आचारसंहिता सुरू असल्याने काम करता आले नाही. त्यामुळे आता आठवडाभरात काम करणार असल्याचे सांगण्यात येते. सदर राज्यमार्गावरील जुना रस्ता काढून संपूर्ण रस्ता नविन करण्याची मागणी गत पाच वर्षांपासून शासनदरबारी पडून आहे; मात्र निगरगट्ट शासकीय यंत्रणेला प्रवाशी हिताशी काही देणेघेणे नसल्याची प्रतिक्रिया या रस्त्याने प्रवास करणार्‍यांकडून उमटत आहे. संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)