शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

वीजदेयकापोटी जिल्ह्यात ३४ कोटींची रक्कम थकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 05:00 IST

संपूर्ण जिल्ह्यात ३ लाख ३ हजार ३१७ घरगुती वीजग्राहक, तर १९ हजार ९८७ व्यावसायिक वीजजोडणी आहेत. घरगुती वीजग्राहकांकडे ५३ कोटी ७२ लाख रुपये देयकापोटी थकीत आहेत; तर व्यावसायिक ग्राहकांकडे ७ कोटी ४२ लाख रुपये थकीत आहेत. याशिवाय जिल्ह्यातील एकूण ७८ हजार ५०७ कृषिपंपधारकांकडे २०३.२७ कोटी रुपये थकीत आहेत. यामुळे महावितरणकडून धडक वसुली मोहीम राबविली जात आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊन काळातील प्रश्न : घरगुती, व्यावसायिक आणि शासकीय ग्राहकांचा समावेश

सुहास घनोकारलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सर्वसामान्य ग्राहक आणि कृषिपंपधारकांकडे थकीत असलेले वीज देयक वसुलीसाठी वीजमहावितरण कंपनीकडून धडक मोहीम राबविली जात आहे. असे असताना बहुतांश शासकीय कार्यालयांकडे मोठ्या प्रमाणावर वीजदेयक थकीत असल्याची बाब पुढे आली आहे. वर्धा उपविभागातील तब्बल ८१ शासकीय कार्यालयांसह ग्रामपंचायतींकडे पथदिवे आणि नळयोजना अशा एकूण २ हजार ६१९ ग्राहकांकडे वीज देयकापोटी ३४ कोटी ३ लाख रुपये थकीत आहेत.संपूर्ण जिल्ह्यात ३ लाख ३ हजार ३१७ घरगुती वीजग्राहक, तर १९ हजार ९८७ व्यावसायिक वीजजोडणी आहेत. घरगुती वीजग्राहकांकडे ५३ कोटी ७२ लाख रुपये देयकापोटी थकीत आहेत; तर व्यावसायिक ग्राहकांकडे ७ कोटी ४२ लाख रुपये थकीत आहेत. याशिवाय जिल्ह्यातील एकूण ७८ हजार ५०७ कृषिपंपधारकांकडे २०३.२७ कोटी रुपये थकीत आहेत. यामुळे महावितरणकडून धडक वसुली मोहीम राबविली जात आहे. कृषिपंपधारकांकडून आतापर्यंत महावितरणकडे २ कोटी ५२ लाख रुपयांचा भरणा करण्यात आला आहे. या ग्राहकांकडूनही सक्तीने वसुली केली जात आहे. मात्र, शासनाच्याच शासकीय कार्यालयांकडे कोटी रुपयांवर रक्कम थकीत असताना, कुठलीही कारवाई महावितरणकडून केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वर्धा विभागांतर्गत आर्वी,  हिंगणघाट आणि वर्धा असे तीन विभाग असून, या माध्यमातून घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. नागरिकांनही आपली जबाबदारी ओळखत थकीत देयक भरले पाहिजे. 

८१ कार्यालयांकडे १२ लाख २५ हजार थकीत

जिल्ह्यातील तब्बल ८२ शासकीय कार्यालयांकडे वीज देयकापोटी १२ लाख २५ हजार रुपये थकीत आहेत. याशिवाय नळयोजनेचे १०४७ शासकीय ग्राहक आहेत. या ग्राहकांकडे ६ कोटी ८१ लाख ५९ हजार रुपयांची रक्कम देयकापोटी थकीत आहे. ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्यावतीने पथदिवे उभारण्यात आले असून, हे १४९१ ग्राहक आहेत. या ग्राहकांकडे २८ कोटी १० लाख रुपये वीज देयकापोटी थकीत आहेत. महावितरणच्या उपविभागांतर्गत एकूण २ हजार ६१९ शासकीय ग्राहक असून, त्यांच्याकडे एकूण ३४ कोटी ३ लाख रुपयांची रक्कम थकीत असून, यात जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती या प्रमुख कार्यालयांचा समावेश असल्याची बाब पुढे आली आहे.

शासकीय कार्यालयांना बजावली नोटीसवीज देयकापोटी थकीत रक्कम वसुलीसाठी वीज महावितरण कंपनीकडून शासकीय कार्यालयप्रमुखांना नोटीस बजावण्यात आली आहे. काही शासकीय कार्यालयांकडून थकीत रकमेचा भरणा केला जात आहे. मात्र, नळयोजना व पथदिवे असलेल्या ग्रामपंचायतींकडून वीज देयकाची रक्कम वसूल करताना अडचणी येत असल्याची माहिती वीज महावितरण कंपनीतील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी लोकमतच्या प्रतिनिधीला दिली. 

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण